Saturday, January 3, 2026

यावर्षी मराठी बिग बॉस सुरू होणार 'या' वेळेला; कलर्सवरील इतर मालिकांच्या वेळांमध्येही बदल, जाणून घ्या नव्या वेळा

यावर्षी मराठी बिग बॉस सुरू होणार 'या' वेळेला; कलर्सवरील इतर मालिकांच्या वेळांमध्येही बदल, जाणून घ्या नव्या वेळा

मुंबई: हिंदी बिग बॉस संपल्यानंतर चाहत्यांना प्रतीक्षा लागली आहे, 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाची. बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाला काही दिवसच बाकी आहेत. बिग बॉसचा प्रोमो सुद्धा आला आहे. त्यामुळे चाहत्यांना आता बिग बॉसच्या घरात कोण येणार? याची उत्सुकता लागली आहे. मात्र बिग बॉस सुरू होण्याआधी कलर्स मराठीवरील इतर मालिकांच्या वेळांमध्ये बदल झाल्याची बातमी समोर आली आहे. बिग बॉसच्या सहाव्या पर्वामुळे कलर्स मराठीवरील एकूण सहा मालिकांच्या वेळांमध्ये बदल होणार आहेत. हे बदल नेमके काय असतील जाणून घेऊयात...

दरवर्षी बिग बॉस मराठीचा कार्यक्रम रात्री ९ वाजता सुरू व्हायचा. मात्र यावर्षी ११ जानेवारीपासून बिग बॉस मराठीचे सहावे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रात्री ८ वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. यामुळे 'बिग बॉस' सुरू होणार असलेल्या दिवसापासून 'कलर्स मराठी'वर काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. कलर्स मराठीवर रात्री ८ वाजता 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका प्रसारित केली जाते. याची वेळ ११ जानेवारीपासून बदलण्यात येणार असून ही मालिका सायंकाळी ७:३० वाजता प्रसारित होईल. तर 'जय जय स्वामी समर्थ' मालिका आता नव्या वेळेनुसार साडे सात वाजता लागणार असल्याने साडे सात वाजताचा लागणारी 'पिंगा ग पोरी पिंगा' हि मालिका रात्री अकरा वाजता प्रसारीत होणार आहे.

दुसरीकडे रात्री साडे आठ वाजता ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेली 'अशोक मा. मा.' ही मालिका येत्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे. याबाबत आतापर्यंत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यानंतर रात्री नऊ वाजता प्रसारीत होणारी 'आई तुळजा भवानी' मालिका ११ तारखेपासून रात्री सात वाजता प्रसारीत होणार आहे. तर सात वाजता प्रसारीत होणारी 'इंद्रायणी' मालिका आता साडे सहा वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान बिग बॉसचा प्रोमो प्रसिद्ध होताच रितेश देशमुखच्या कोड्यातून गेम आणि घराची थीम सांगणाऱ्या प्रभावी संवादाने प्रेक्षकांचे लक्ष्य वेधले आहे. मात्र आतापर्यंत आलेल्या छोट्या-छोट्या क्लिपमधून रितेशने प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे. कधी नवा लुक, तर कधी वेगवेगळे सरप्राइझ, वेगळी स्टाईल तर कधी खास अंदाजामधून रितेश समोर आला आहे. अशाप्रकारे यंदाच्या सीझनची थीम आगळ्यावेगळ्या पद्धतीतून प्रेक्षकांच्या समोर आणण्याकरिता एका हटके लुकमध्ये रितेश दिसत आहे. ‘फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत” तर "याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ" अशा कडक शब्दांत रितेश भाऊंनी हा सीझन धुरळा करणार असल्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment