रिंकू राजगुरूच्या धमकेदार लावणीने वेधल प्रेक्षकांच लक्ष..


मुंबई : सैराट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आणि सध्या आशा या चित्रपटून चर्चेत असणारी अशी सगळ्यांची आवडती अशी अभिनेत्री रिंकु राजगुरू . सध्या सोशल मीडियावर रिंकू राजगुरू तिच्या एका व्हायरल व्हिडिओमुळं चर्चेत आली आहे. तिचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. त्या व्हिडिओमध्ये रिंकूने सुंदर नृत्य केल असून ती खूप देखणी दिसत आहे. सध्या सर्वत्र तीच कौतुक सुरू आहे. या तिनं हे नृत्य प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटीलबरोबर केला आहे. रिंकूनं लता मंगेशकर यांच्या 'राजसा जवळी जरा बसा' या लावणीवर भन्नाट नृत्य करून सर्वांना मोहित केलं आहे.


रिंकू राजगुरूची धमाकेदार लावणी : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिंकूनं लाल- केशरी रंगसंगतीची साडी नेसली आहे. या लुकमध्ये रिंकूने मराठमोळा साजश्रृंगार केला आहे. त्यामध्ये तिनं डिझायनर ब्लाऊज, गळ्यात हार, नाकात नथ, पायात घुंगरू हे सर्व परिधान केल आहे. रम्यान अभिनेत्रीनं तिचा हा व्हिडिओ शेअर करत आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आपल्या पिढ्यांची वारसा असणारी लावणी. लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या असंख्य गोड आठवणी मनात साठलेल्या आहेत. बऱ्याच वर्षांनी पुन्हा लावणी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे तुमच्यासोबत share करताना मला आनंद वाटत आहे. 'याशिवाय रिंकूनं आपल्या पोस्टमध्ये काही इमोजी देखील शेअर केले आहे.





रिंकू राजगुरूचं झालं कौतुक : रिंकू राजगुरूला लावणी कोरियोग्राफर आशिष पाटील यांनी शिकवली आहे. ही लावणी रिंकून २ तास सराव करून शिकली आहे. तसेच तिच्या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'खूप छान रिंकूजी.' दुसर्‍या एकानं लिहिलं, 'कमीत कमी १० वेळा पाहिली मी खूप मस्त रिंकू' आणखी एकानं लिहिलं, 'आर्ची खूप सुंदर दिसतेस, नृत्य पण छान करतेस एक नंबर .' याशिवाय अनेकजण या पोस्ट फायर इमोजी शेअर करत आहेत. दरम्यान रिंकू ही नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटामुळं खूप चर्चेत आली होती. तिचा हा चित्रपट दमदार होता. या चित्रपटानं १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर आकाश ठोसर हा मुख्य भूमिकेत दिसला होता. आता रिंकू राजगुरूचा १९ डिसेंबर रोजी 'आशा' हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट महिलांच्या संघर्षांवर आधारित आहे.


Comments
Add Comment

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

Sonu Nigam : "ते १२ रुपये फ्रेम करून मी आजही माझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत", सोनू निगमने सांगितला जबरदस्त किस्सा

मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये