मुंबई : सैराट या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आणि सध्या आशा या चित्रपटून चर्चेत असणारी अशी सगळ्यांची आवडती अशी अभिनेत्री रिंकु राजगुरू . सध्या सोशल मीडियावर रिंकू राजगुरू तिच्या एका व्हायरल व्हिडिओमुळं चर्चेत आली आहे. तिचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. त्या व्हिडिओमध्ये रिंकूने सुंदर नृत्य केल असून ती खूप देखणी दिसत आहे. सध्या सर्वत्र तीच कौतुक सुरू आहे. या तिनं हे नृत्य प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटीलबरोबर केला आहे. रिंकूनं लता मंगेशकर यांच्या 'राजसा जवळी जरा बसा' या लावणीवर भन्नाट नृत्य करून सर्वांना मोहित केलं आहे.
रिंकू राजगुरूची धमाकेदार लावणी : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिंकूनं लाल- केशरी रंगसंगतीची साडी नेसली आहे. या लुकमध्ये रिंकूने मराठमोळा साजश्रृंगार केला आहे. त्यामध्ये तिनं डिझायनर ब्लाऊज, गळ्यात हार, नाकात नथ, पायात घुंगरू हे सर्व परिधान केल आहे. रम्यान अभिनेत्रीनं तिचा हा व्हिडिओ शेअर करत आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आपल्या पिढ्यांची वारसा असणारी लावणी. लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या असंख्य गोड आठवणी मनात साठलेल्या आहेत. बऱ्याच वर्षांनी पुन्हा लावणी करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे तुमच्यासोबत share करताना मला आनंद वाटत आहे. 'याशिवाय रिंकूनं आपल्या पोस्टमध्ये काही इमोजी देखील शेअर केले आहे.
रिंकू राजगुरूचं झालं कौतुक : रिंकू राजगुरूला लावणी कोरियोग्राफर आशिष पाटील यांनी शिकवली आहे. ही लावणी रिंकून २ तास सराव करून शिकली आहे. तसेच तिच्या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'खूप छान रिंकूजी.' दुसर्या एकानं लिहिलं, 'कमीत कमी १० वेळा पाहिली मी खूप मस्त रिंकू' आणखी एकानं लिहिलं, 'आर्ची खूप सुंदर दिसतेस, नृत्य पण छान करतेस एक नंबर .' याशिवाय अनेकजण या पोस्ट फायर इमोजी शेअर करत आहेत. दरम्यान रिंकू ही नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटामुळं खूप चर्चेत आली होती. तिचा हा चित्रपट दमदार होता. या चित्रपटानं १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर आकाश ठोसर हा मुख्य भूमिकेत दिसला होता. आता रिंकू राजगुरूचा १९ डिसेंबर रोजी 'आशा' हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट महिलांच्या संघर्षांवर आधारित आहे.