Saturday, January 3, 2026

'प्रहार' शनिवार विशेष- रेखाची रोजिनिशी

'प्रहार' शनिवार विशेष- रेखाची रोजिनिशी

मोहित सोमण

नाव रेखाची रोजिनिशी मला आजही हा धडा आठवतो. २००२ साली माध्यमिक शिक्षण घेत असताना मला आजही तो धडा चांगलाच आठवतो. इतर धडे फारसे आठवत नाहीत. आज काही वयाच्या ९० व्या वर्षीही आजीआजोबांच्या शाळेतील कविता पाठ असतात हे मात्र नवलच आहे. पण हेच जीवनाचे काय सार आहे याचा वस्तूपाठ मांडणे क्रमप्राप्त आहे. रेखा नावाची मुलगी रोज रात्री झोपताना दिवसभरात काय घडले याबद्दल लिहित असते. तोच तिचा सर्वाधिक प्लस गुण असल्याने वर्गातील सगळ्या मुलींना मागे टाकत वेगळी ठरते. यातच तिच्या यशाचे रहस्य दडले आहे. खरं तर आपलं लहानपणापासून विचार मंथन करताना अनेक गोष्टीचा मागोवा घेतो त्यावर किस पाडतो. कधी पुन्हा विसरून जातो पुन्हा आठवतो पुन्हा काही तरी चांगले सूचते नंतर लिहू म्हणून लेखणी उचलत नाही व पुन्हा विसरतो. त्यातून जगातील अनेक कल्पना अद्याप समोर आलेल्या नाहीत. वास्तविक पाहता त्या शब्दबद्ध केल्यास मोठा फायदा मानवाला होणार आहे. आणि मानवाला होणार आहे म्हणून व्यवसायिकाला होणार आहे.

एक यशस्वी व्यवसायिकाचे रहस्य त्यांच्या काटेकोर सवयीत दडले आहे. दिवसभरात झालेली प्रत्येक घडामोड व्यवसायिकांनी लिहिणे अपेक्षित आहे. आयुष्याचा सारिपाट लिहिताना त्यातील कण टिपणे व शब्दबद्ध करत वाचकांसमोर आणणे हे आपले परम कर्तव्य आहे. रेखाची रोजनिशी यासाठी आठवले की हिंदुस्थानातील सिंधू संस्कृतीपासून हा लिहिण्याचा वारसा जपला गेला आहे. मोहोजोदडो असो अथवा चालुक्याचा चित्रकुटाचा काळ असो लिहिणे अथवा चिन्हाकिंत करणे हे काळाच्या ओघात किती महत्वाचे हे आपल्याला लक्षात येईल ज्याचा थेट परिणाम पुढील पिढीवर होईल. त्याचप्रमाणे एक व्यवसायिक म्हणून आपला दररोज काय व्यापार केला अथवा काय घडामोडी घडल्या त्या न चुकता लिहिणे महत्वाचे ठरते. अर्थात कॉर्पोरेट कंपन्या त्यांचा हिशोब, अर्थव्यवहार, त्यांचे सगळे हिशोब, नफा तोटा सगळंच लिहितात. पण वैयक्तिक आयुष्यात त्या संबंधित दिवशी काय घडले कोण भेटायला आले कोण भेटणार आहे काय तारीख आहे काय वार आहे किती रुपये घेतले दिले याचा दिवसानिशी वेळेनिशी लिहिणे हे कधीना कधी व्यवसायिकाला फायदेशीर ठरू शकते‌. इतकेच नाही तर कधी कधी अतिशयोक्ती नाही पण लिखापाडी व्यावसायिकाला न्यायही देऊ शकते. रात्री झोपताना दिवसभरात काय व्यवहार केले आपला हिशोब किती बरोबर किती चूक भविष्यातील आर्थिक तूट नफा, तोटा, जमा सगळ्याचेच हिशोब वेळोवेळी निर्णय घेताना मदत करतात. त्या हिशोब अथवा रोजीनिशीमुळे पुढे काय घडेल याचा मागोवा आताच घेणे शक्य असते.

त्यामुळे गेल्या वेळी आपले काय चुकले काय करायला हवे होते याचे संक्षिप्त विश्लेषण करण्यासा माणसाला अथवा व्यवसायिकाला मदत होत. वहीवरून नजर फिरवताना व्यवसायिकासाठी अनेक आर्थिक व बिगर आर्थिक निर्णय नियोजन घेणे शक्य होते. काळ व्यवसायिकांसाठी वैराचा आहे.'वैराग्याचा' नाही! वाढलेली आकस्मिक संकटे, वाढलेल्या खर्चाची ताळेबंदी, जागतिक आव्हाने, नफा तोटा, भविष्यातील व्यवसायिक संकटे, संधी, आव्हाने, धोके, बलस्थाने, कमजोर जागा सगळंच ओळखता येते ते ही केवळ लेखणीच्या सहाय्याने. ज्याला आपण व्यवसायिक भाषेत 'स्वॉट अँनालिसिस' म्हणतो.

या लेखणीतूनच इतिहास घडला, वर्तमान घडत आहे भविष्यही घडेल पण संधी हुकली की पुन्हा परतत नाही. योग्य वेळी योग्य निर्णय व्यवस्थापनात अथवा व्यवसायात कामी येतो. व्यवसायाचे स्वाभाविकपणे तसेच आहे. इतरत्र चर्चा होत असताना त्याच्या नोंदणी ठेवणे किती महत्वाचे आहे ते आपल्या पूर्वजांनी आपल्याला लेखणीतूनच विशद केले आहे. हल्ली हिशोबासाठी, अथवा आर्थिक विश्लेषणाची अ‍ॅप निश्चितच बाजारात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सही आहे. पण हाताने लिहिल्यास जी वैचारिक स्फूर्ती मिळेल ती यंत्राच्या साह्याने मिळू शकत नाही. आपला मेंदू हाताने लिहिताना मोठ्या प्रमाणात उत्तेजित होतो. ती सरणगाथा इतिहास आणि साहित्य घडवते. आणि इतिहास व साहित्य नागरिक व देशाचे भवितव्य घडवते. आर्थिक जगही त्याला अपवाद नाही. ज्या दिवशी व्यापारी कोणाला भेटला त्याच्याशी कुठल्या विचारावर बोलणे झाले कशाबद्दल झाले संदर्भ काय होता पुढे काय भाकीत आहे त्यातून संभावना काय आहेत सगळ्याच्याच मतितार्थ घेण्याची लेखणी हे हक्काचे माध्यम आहे.

रेखाने रोजनिशी लिहून लोकांना चमत्कारिक वाटावे असे यश का प्राप्त केले त्याच यश लिहिलेल्या डायरीत होते. प्रासंगिक चातुर्य, प्रबळता, व्यवहारज्ञान, युक्ती अशा सगळ्याच गोष्टी रेखाने डायरीमधूश शिकल्या. आपल्या आईशी रेखाने रेखाची रोजिनिशी नावाची डायरी शेअर करत व पत्र लिहित आपले विवेचन केले. आईच्या संदर्भासह रेखाने शिकलेल्या जगातील गोष्टी यांच्या साच्यातून रेखा तयार झाली आणि जीवनात बाजी मारुन गेली. आजच्या 'जेन झी' युगात हातात पेन कधी घेत असेल ते आपणास माहित नाही. पण पेनाची विक्री बाजारात मांडणे महत्वाचे आहे. कुठलाही यशस्वी व्यक्ती बारकाईने पाहिल्यास तुम्हाला अनेक गोष्टीची लेखणीत नोंद करत असताना दिसेल.

उदाहरण द्यायचे झाल्यास क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांना शिकवत असताना क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांनी सचिन तेंडुलकर मोठा झाल्यानंतरही अनेकदा टीव्ही बघताना सचिनच्या प्रत्येक बँटिगचे विश्लेषण करून सचिनला अभिप्राय पोहोचवत असतं. श्रेष्ठ गुरू कसा बनतो याची परिणती या रहस्यात दडलेली आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे चित्रपटसृष्टीचा दिग्गज कलाकार व खलनायकाच्या भूमिकेत दिसलेलं शक्ती कपूर यांना लिहिण्याची भरपूर सवय आहे हे फार कमी जणांना माहिती असेल. कारण शक्ती कपूर हे कायम चित्रपटाचे शुटींग करत असल्यास स्वतःसह समोरच्या अभिनेत्यासोबत काम करताना त्यांच्या अक्टिंगचे टाईमिंग, लकब, हावभाव, तांत्रिक बारकावे लिहून काढते. आजपर्यंतही ते आपली डायरी शुटिंगच्या दरम्यान खिशात बाळगतात. हीच त्यांची खासियत आहे. त्यामुळे आज त्यांनी ४५० पेक्षा अधिक चित्रपटात केवळ काम नाही केले तर स्वतःची कन्या श्रद्धा कपूर हिच्या अभिनयाला नवा आयाम दिला.

असेच आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय रेखाने घेतले. ३६५ दिवशी प्रत्येक मिनिटाला आपण काय काय करत होतो त्याचा सारांश काढत आपल्याला आता नव्या वर्षात काय केले पाहिजे हे रेखाने ओळखले. व्यवसायिकाचे तसेच आहे. नव्या चुका न करता आधीच्या कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत याचा लेखाजोखा केवळ डायरीतील रोजनिशीमुळे व्यवसायिकांना कल्पना येऊ शकते. आजचे क्लिष्ट व्यवसायिक वातावरण शत्रू काय करु शकतो हे भापून प्रतिकात्मक उपाय म्हणून काय अँक्शन घेतली पाहिजे याचा निर्णय दैनंदिन रोजनिशीतून येतो.

असं म्हणतात आपण दिवसभरात जे जे वाचतो जेजे लिहितो त्यातील केवळ ३०% आपण आत्मसात करतो उर्वरित विसरतो. जीवनाच्या परिक्षेतही तसंच आहे. व्यवसायिकांना पण हाच नियम लागू होतो. यशस्वी होण्याचा राजमार्ग लेखणी आहे. रेखाची रोजिनिशी हेच शिकवते. तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहिणे शक्य नसेल तरी रोजच्या महत्वाच्या घडामोडी विशेषतः उद्योजकांना अथवा व्यापाऱ्यांनी लिहिणे खूप महत्वाचं आहे. त्यामुळेच ही 'रेखा' यशाची गुरुकिल्ली शिकवते. जगण्यासाठी प्रत्येक जण धडपड करतो. पण जो जिता वही सिकंदर होतो. बुद्धीबळाची चाल सुद्धा लिखित पद्धतीने शिकवली जाते. जगातील कुठलीही बाब हाताच्या लेखणीने घडली आहे. अगदी व्यावसायिकांच्या बाबतीत सुद्धा पूर्वापार पद्धतीच चोपडी ठेवली जात असे त्याचे रूपांतर हे अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये झाले त्याचाही वेगळा एक रंजक इतिहास आहे. तुम्ही १ रूपया खर्च केले का ४ रुपये याला महत्त्व देण्यापेक्षा मी का केले कुठल्या कारणासाठी केले त्यातून काय साध्य होईल व त्याचा भविष्यात काय परिणाम होईल याचा बारकावा रोजीनिशीची पाने चाळत व्यापाऱ्यांना मिळू शकतो. त्याचा त्यानंतर चाटजीपीटीचा वापर करून निष्कर्ष काढला तर तो भाग वेगळा. पण इतिहास ते भविष्य शिस्तबद्ध पद्धतीने आकलन करण्याची संधी लेखणीच अथवा रोजीनिशीच देऊ शकते.

Comments
Add Comment