सुक्या मासळीची आवक वाढल्याने दर आटोक्यात

अलिबाग : रायगड जिल्हा ताज्या मासळीबरोबरच सुक्या मासळीसाठीही प्रसिद्ध असल्याने जिल्ह्यात ठिकाठिकाणी सुक्या मासळीच्या बाजारपेठा नजरेत पडतात. या बाजारपेठांमध्ये लाखोंची उलाढाल होत असून, सध्या रायगड जिल्ह्यात सुक्या मासळीची आवक वाढल्याने सुक्या मासळीचे दरही आटोक्यात आहेत. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांकडून मोठ्याप्रमाणात सुक्या मासळीची खरेदी होत असल्याचे चित्र आहे.


महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई, कोकण आणि किनारपट्टीच्या भागात सुकी मासळी खूप लोकप्रिय आहे. दरदिवशी समुद्रात मिळालेली ताजी मासळी ही सगळीच विकली जात नाही. त्यामुळे ही मासळी सुकवून नंतर विकली जाते.


सध्या ओली मासळी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने अलिबाग, मुरड, उरण, श्रीवर्धन, नावगाव, वरसोली याठिकाणी मासळी सुकवली जाते. सध्या मासळी सुकविण्यासाठी, तर सायंकाळी सुकविलेली मासळी जमा करण्यासाठी कोळी महिलांची लगबग सुरु असते.


रायगड जिल्ह्यात ४ हजार ९९३ छोट्या-मोठ्या नौकांच्या माध्यमातून मासेमारी करण्यात येते. बाजारात ताजे मासे मुबलक आल्याने माशांना फारशी किंमत मिळत नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेले ताजे मासे फेकून फुकट घालविण्यापेक्षा हे मासे सुकविले जातात. बोंबिल, अंबाड, जवळा, कोळंबी, ढोमी आदी छोट्या मासे देखील सुकविले जातात.


प्रमुख बाजारपेठा : अलिबाग, श्रीवर्धन, उरण, नावगाव.


प्रमुख मासळी : बोंबिल, कोळंबी, जवळा, बांगडा.


परिस्थिती : आवक वाढल्याने दर आटोक्यात, पर्यटकांची पसंती.

Comments
Add Comment

ताम्हिणी घाटात अपघाताचे सत्र सुरूच

सकाळी बस डोंगराला आदळली ; संध्याकाळी गाडी दरीत कोसळली प्रमोद जाधव माणगाव : नववर्षाच्या पर्यटनासाठी कोकणात

५० जणांना घेऊन जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात भीषण अपघात, कारलाही उडवलं, पोलीस घटनास्थळी

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या ताम्हिणी घाटात शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. सुमारे

ओम सिद्धी साई दिंंडी कोकण श्रीक्षेत्र शिर्डीकडे रवाना

३०० किमीच्या पदयात्रेत ४०० साईभक्त सामील प्रमोद जाधव माणगाव : गेली १३वर्षाची परंपरा आणि १४ व्या वर्षात पदार्पण

पालीमध्ये दूध पिऊन थर्टी फस्ट साजरा

सुधागड पाली : थर्टी फर्स्ट म्हटलं की आपल्याला बऱ्याचदा हातात दारूचा ग्लास व डीजेच्या तालावर डोलणारी तरुणाई व

आयटीआय परिसरात बिबट्या असल्याचा संशय

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वनविभागाचे आवाहन रोहा : नागोठणे येथील शासकीय औद्योगिक शिक्षण संस्थेच्या परिसरात

विकास गोगावलेंना तडीपार करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन

अलिबाग : मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्यावर कारवाईसाठी विरोधक