Monday, January 5, 2026

आयपीएलमध्ये एकाही बांगलादेशी खेळाडूला खेळू देणार नाही

आयपीएलमध्ये एकाही बांगलादेशी खेळाडूला खेळू देणार नाही

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा इशारा

मुंबई : ज्याप्रकारे हिंदूंवर बांगलादेशात अत्याचार होत आहेत. हिंदूंना जिवंत जाळलं जात आहे आणि ज्याप्रकारे बांगलादेश भारतविरोधी भूमिका घेत आहे. हे पाहता बांगलादेशच्या कोणत्याही खेळाडूला आम्ही आयपीएलमध्ये खेळू देणार नाही. ही राष्ट्रवादाची बाब आहे, राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडतोज केली जाणार नाही. एकाही बांगलादेशी खेळाडूस मुंबईत खेळू देणार नाही, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी इशारा दिला आहे.

बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सातत्याने अल्पसंख्यांकांवर विशेषकरून हिंदूंवर जीवघेण्या हल्ल्याच्या आणि त्यांच्या निर्घृण हत्येच्या घटना घडत आहेत. यावरून बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षितेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भारत सरकारने या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करत बांगलादेश सरकारला जाब विचारला आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही या घटनांवरून बांगलादेश सरकारवर टीका सुरू आहे.

मात्र असे जरी असले तरीही अद्यापपर्यंत या घटना थांबल्याचे दिसत नाही. हिंदूंवर अत्याचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. अमित साटम म्हणाले की, हेच कारण आहे की बीसीसीआयने हे फर्मांन काढले आहे. मग तो शाहरुख खानच्या संघामधील असेल किंवा आणखी एका संघाचा, बांगलादेशी खेळाडूंना कोणत्याही आयपीएल संघात खेळू देणार नाही. असेही साटम यांनी म्हटले आहे.

न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी उमर खालीद बाबत केलेल्या विधानावर बोलताना अमित साटम म्हणाले, काही आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये ज्याप्रकारे इस्लामी जिहादींनी कब्जा करून तेथील रंग बदलला आहे. त्याचप्रकारे मुंबईचा रंग बदलण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि हा एक आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग आहे. ते म्हणाले, ‘काँग्रेस, सपा, एमआयएम, ठाकरे देशविरोधी शक्तींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु मुंबईकर जागरूक आहेत. मुंबईचा रंग बदलण्याचे असे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही मुंबईचे मोमडियेनाइजेशन होऊ देणार नाही’.

Comments
Add Comment