तेलंगणा : छत्तीसगडमधील नक्षली चळवळीचा कणा मानला जाणारा व दरभा डिव्हिजनल कमिटीचा सचिव बारसे देवा ऊर्फ सुक्का याने तेलंगणा पोलिसांसमोर १ जानेवारीला रात्री आत्मसमर्पण केले आहे. देवावर ५० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमाचे एन्काउंटर झाल्यानंतर नक्षली संघटनांमध्ये मोठी फूट पडल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांनी जहाल कमांडर म्हणून माडवी हिडमा याचा खात्मा केला होता. तेव्हापासूनच बारसे देवा दहशतीखाली होता. केंद्र सरकारचे ‘ऑपरेशन कगार’ आणि पोलिसांचा वाढता दबाव यामुळे अखेर बारसे देवाने मध्यस्थांमार्फत चार राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधला.