कमी खर्चात अधिक सुविधा ; MSRTC ची नवी पास योजना ?


मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन योजना काढली आहे. योजनेनुसार ई- बस सेवेचा वापर वाढवण्यासाठी नवीन मासिक आणि त्रेमासिक पास योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य हेतु असा आहे की दररोज एकाच मार्गवर नोकरी , व्यवसाय अथवा शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना कमी खर्चात अधिक सुविधा देणे हा आहे. या पास योजनेमुळे ई-बस सेवा अधिक किफायतशीर ठरणार असून प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत.


नवीन पास योजनेमुळे पैसे आणि वेळ दोन्ही वाचणार


एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की खासगी वाहनांचा वापर कमी करून जास्तीत जास्त प्रवाशांनी ई-बसमधून प्रवास करावा,यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. रोजच्या प्रवाशांना ई-बसकडे आकर्षित करणे हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे.


सध्या MSRTC च्या ई-बस प्रकल्पांतर्गत ४४८ ई-बस कार्यरत असून शिवाई प्रकल्पामध्ये आणखी ५० ई-बस सेवा देत आहेत. येत्या काही महिन्यांत या बसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात अधिक मार्गांवर ई-बस सेवा सुरू होणार आहे. या योजनेत मासिक आणि त्रैमासिक असे दोन प्रकारचे पास उपलब्ध आहेत. मासिक पासमध्ये ३० दिवसांचा प्रवास कालावधी असून केवळ २० दिवसांचे भाडे भरावे लागणार आहे. तर त्रैमासिक पासमध्ये ९० दिवसांचा कालावधी असून ६० दिवसांचे भाडे भरल्यास संपूर्ण ९० दिवस प्रवास करता येणार आहे.


मुंबई-ठाणे-अलिबाग प्रवाशांसाठी खुशखबर!


मुंबई ते ठाणे, अलिबाग यांसारख्या जवळच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात दैनंदिन प्रवासी प्रवास करतात. या मार्गांवर आधीपासूनच ई-बस सेवा सुरू असल्यामुळे नवीन पास योजनेचा थेट फायदा या प्रवाशांना होणार आहे. प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि स्वस्त होईल, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.


ही पास योजना मीटर आणि १२ मीटर ई-बस तसेच ई-शिवाई बस सेवेसाठी लागू असणार आहे. त्यामुळे नियमित ई-बस प्रवाशांना या योजनेचा मोठा दिलासा मिळणार आहे.




Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि