कोकणातलो बाबूली मेस्त्री गाजवणार ऑस्कर; दशावतार सिनेमाची ऑस्करसाठी निवड

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ... . २०२५ मध्ये प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळवणारा ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट थेट ऑस्कर अर्थात अकॅडमी अवॉर्ड्स २०२६ च्या मुख्य स्पर्धेत पोहोचला आहे. विशेष म्हणजे मराठी सिनेइतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाची ‘मेन ओपन फिल्म कॅटेगरी’मध्ये निवड झाल्याने सिनेप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.


‘दशावतार’ने मागील वर्षी बॉक्स ऑफिसवर यश मिळवताच कलात्मक आणि पारंपरिक सांस्कृतिक मांडणीमुळेही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मराठी प्रेक्षकांसोबतच अमराठी रसिकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं. इतकंच नाही, तर हा सिनेमा मल्याळम भाषेतही प्रदर्शित करण्यात आला होता. आता २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ‘दशावतार’ मराठी सिनेमाचं नाव उज्ज्वल करताना दिसतो आहे.


चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितलं की, अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेसाठी जगभरातून १५० हून अधिक चित्रपटांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये ‘दशावतार’ हा एकमेव मराठी चित्रपट आहे. विशेष म्हणजे अकॅडमीच्या अधिकृत स्क्रीनिंग रूममध्ये दाखवला जाणारा हा पहिलाच मराठी सिनेमा ठरणार आहे.


 


सुबोध खानोलकर यांनी निर्मात्यांना आलेल्या अधिकृत ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर करत ही निवड निश्चित असल्याचं स्पष्ट केलं. अनेक वर्षांची मेहनत, प्रामाणिक प्रयत्न आणि मोठी स्वप्नं पाहण्याचं धाडस याची आज दखल घेतली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. ‘दशावतार’चं हे यश केवळ एका चित्रपटापुरतं मर्यादित नसून, मराठी सिनेमा जागतिक पातळीवर सक्षमपणे उभा राहू शकतो, याचा हा ठोस पुरावा असल्याचं त्यांनी सांगितलं.


या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी बाबुली मेस्त्री या कोकणातील दशावतार कलाकाराची भूमिका साकारली असून, त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. यासोबतच महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, रवी काळे, विजय केंकरे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर आणि कोकणातील स्थानिक कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.


ऑस्कर जिंकणं किंवा अंतिम यादीत पोहोचणं हा पुढचा टप्पा असला, तरी मुख्य स्पर्धेत मराठी चित्रपटाचा समावेश होणं हीच मोठी बाब मानली जात आहे. ‘दशावतार’मुळे मराठी सिनेमाची मान जागतिक स्तरावर उंचावली असून, हा प्रवास केवळ सुरुवात असल्याची भावना सिनेप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

‘तो ती आणि फुजी’ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुपरहिट

पुणे : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जापानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे

साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , 'पालखी' चित्रपटाचा मुहूर्त

मुंबई : श्रद्धा ही केवळ भावना नाही, ती आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर आणि अढळ

करण जौहरचा चित्रपट ऑस्कर 2026 मधुन बाहेर;चाहत्यांमध्ये निराशा..

मुंबई :ऑस्कर २०२६, ९८व्या अकॅडमी अवॉर्ड्सच्या नामांकनांची अधिकृत यादी जाहीर झाली असून, भारताकडून अधिकृत प्रवेश

भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’

मुंबई : इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध

मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!

सॅन होजे (मनोरंजन प्रतिनिधी) : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे

फरहान अख्तर अभिनीत ‘120 बहादूर’पासून सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत – या प्रजासत्ताक दिनी पाहा 7 देशभक्तीपर चित्रपट

प्रजासत्ताक दिन विशेष: फरहान अख्तर अभिनीत ‘120 बहादूर’पासून सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत – हे सात प्रेरणादायी