Saturday, January 3, 2026

इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात ; पुणे परिवहन मंडळाचा अथर्वला इशारा

इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात ; पुणे परिवहन मंडळाचा अथर्वला इशारा

PMPML Issues Notice Influencer Atharva Sudame: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या एका रिलमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अथर्व आता पुन्हा एकदा त्याच्या एका रिलमुळेच वादात अडकला आहे. याप्रकरणी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्यावतीनं अथर्व सुदामेला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, त्याला सात दिवसांच्या आत या व्हिडीओबाबत लेखी खुलासा करुन तो व्हिडीओ सोशल मीडियावरुन तात्काळ हटवण्याचाही इशारा देण्यात आला आहे. असं न केल्यास अथर्व सुदामेविरोधाक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

पूर्वपरवानगी न घेता पीएमपीच्या बसमध्ये रिल्स काढून या रीलमध्ये महामंडळाचा गणवेश, ई-मशीन आणि बॅच बिल्ला यांचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. सात दिवसांच्या पीएमपी मुख्यालयात हजर राहून खुलासा द्यावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पीएमपी प्रशासनानं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. यामध्ये अथर्वला शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली असून येत्या सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, समाजमाध्यमांवरुन संबंधित व्हिडीओ तात्काळ हटवावा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. नोटिसमध्ये नमूद केल्यानुसार, अथर्व सुदामेच्या व्हिडीओमुळे पीएमपीची प्रतिमा मलीन होत आहे. समाजमाध्यमावरील चित्रीकरण न हटवल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, अशा इशारा पीएमपीच्या मुख्य कार्यालयाकडून अथर्व सुदामेला देण्यात आला आहे.

अथर्व सुदामेचं वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं 'ते' रिल

 
View this post on Instagram
 

A post shared by Atharva Sudame (@atharvasudame)

गणेशोत्सवाच्या रिलमुळे अथर्वच्या अडचणींत झालेली वाढ

काही महिन्यांपूर्वी अथर्व गणेशोत्सवाच्या रिलमुळे वादात अडकलेला. यामुळे त्याच्या अडचणींत अधिकच वाढ झालीच होती, त्यासोबतच त्याचा ट्रोलिंगचाही सामना करावा लागलेला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अथर्व सुदामेनं एक व्हिडीओ केला होता. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा एक रिल अथर्वनं तयार केलं होतं. पण, नेमका याच रिलवरुन मोठा वाद उफाळलेला. अथर्वला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. एवढं की, अथर्वला त्याचं रिल डिलीट करावं लागलं आणि माफीही मागावी लागली. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा रील त्यानं बनवला होता. मात्र त्याला ट्रोल करण्यासोबतच धमक्या आणि शिव्या देखील दिल्या होत्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा