मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने न्यूझीलंड विरूद्धच्या वन डे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वन डे मॅचची सीरिज होणार आहे. यातील पहिला सामना ११ जानेवारी रोजी होणार आहे. यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका होणार आहे. निवड समितीने टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच केली आहे. वन डे सीरिजसाठीच्या टीमची घोषणा आज म्हणजेच शनिवार ३ जनेवारी २०२६ रोजी करण्यात आली.
🚨 News 🚨 India’s squad for @IDFCFIRSTBank ODI series against New Zealand announced. Details ▶️ https://t.co/Qpn22XBAPq#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/8Qp2WXPS5P
— BCCI (@BCCI) January 3, 2026
न्यूझीलंड विरूद्धच्या वन डे सीरिजसाठी शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. श्रेयस अय्यर उपकर्णधारपदाची जबाबदारी हाताळणार आहे. केएल राहुल आणि रिषभ पंत यांचा संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.
मानेच्या दुखापतीतून सावरल्यामुळे गिलचे संघात पुनरागमन झाले आहे. वेगवान गोलंदाज सिराज आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. पण श्रेयस अय्यरला फिटनेस टेस्ट पास केल्यानंतरच खेळण्याची संधी मिळणार आहे. श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीमुळे काही काळ उपचार घ्यावे लागले आणि क्रिकेटपासून लांब राहावे लागले. सिराजचे पुनरागमन झाले तरी मोहम्मद शमीला संघात स्थान मिळालेले नाही. तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने न्यूझीलंडचा पराभव करुन स्पर्धा जिंकली होती.
न्यूझीलंड विरूद्धच्या वन डे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा : शुभमन गिल, कर्णधार; रोहित शर्मा; विराट कोहली; केएल राहुल, यष्टीरक्षक; वॉशिंग्टन सुंदर, उपकर्णधार; रविंद्र जडेजा; मोहम्मद सिराज; हर्षित राणा; प्रसिद्ध कृष्णा; कुलदीप यादव; रिषभ पंत, यष्टीरक्षक; नितीश कुमार रेड्डी; अर्शदीप सिंह; यशस्वी जयस्वाल






