Sunday, January 4, 2026

IDBI Bank: कालच्या बँकेच्या शेअर्समधील तुफानीनंतर व्यवसायिक आकडेवारी जाहीर यंदा व्यवसायात १२% वाढ

IDBI Bank: कालच्या बँकेच्या शेअर्समधील तुफानीनंतर व्यवसायिक आकडेवारी जाहीर यंदा व्यवसायात १२% वाढ

मोहित सोमण: आयडीबीआय बँकेने (IDBI Bank) व्यवसायिक आकडेवारी जाहीर केली आहे. आयडीबीआय बँकेच्या प्रोव्हिजनल आकडेवारीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) बँकेच्या एकूण व्यवसायात १२% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील ४८९२४५ कोटींच्या तुलनेत या वर्षात ५४६६३४ कोटींवर वाढ झाली आहे. एकूण ठेवीत (Total Deposit) इयर ऑन इयर बेसिसवर डिसेंबर २२०४ मधील २८२४३९ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरपर्यंत ९% वाढ झाली असून ठेवी ३०७८२८ कोटींवर पोहोचल्या आहेत. कासा ठेवीत (CASA Deposits) करंट व सेविंग अकाऊंट गुणोत्तर ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर ४% वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये १३०८९९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १३५६३० कोटींवर वाढ झाली आहे. अँडव्हान्स ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर १५% वाढ झाल्याचेही बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये नमूद केले. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील २०६८०७ कोटींच्या तुलनेत या डिसेंबर महिन्यापर्यंत २३८८०६ कोटींवर वाढ नोंदवली आहे.

चौथ्या तिमाहीत बँकेला इयर ऑन इयर बेसिसवर तिसऱ्या तिमाहीतील १४८०.८१ कोटींच्या तुलनेत १९२९.०९ कोटींवर वाढ एकत्रित निव्वळ नफ्यात (Consolidated Net Profit) वाढ झाली आहे. एकूण उत्पन्नात तेव्हा १३.८४% वाढ झाली होती. तर बँकेच्या एकूण व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) इयर ऑन इयर बेसिसवर १९.४% वाढ झाली होती. काल आयडीबीआय बँकेच्या शेअर्समध्ये १०.४५% तुफान वाढ झाल्याने बँकेचा शेअर ११४.६० रूपये प्रति शेअरवर पोहोचला होता. तर गेल्या ५ दिवसात बँकेच्या शेअर्समध्ये १२.९६% वाढ झाली असून गेल्या एक महिन्यात बँकेच्या शेअरमध्ये १७.३६% वाढ झाली आहे तर एक वर्षात बँकेच्या शेअर्समध्ये ४७.८३% वाढ नोंदवली गेली आहे. इयर टू डेट बेसिसवर (YTD) बँकेच्या शेअर्समध्ये ११.४८% वाढ झाली आहे.

Comments
Add Comment