दहिसर-काशीगाव ‘मेट्रो ९’ टप्पा लवकरच सुरू होणार

सीएमआरएस चाचण्या अंतिम टप्प्यात


मुंबई : 'दहिसर -भाईंदर मेट्रो ९' मार्गिकेतील दहिसर–काशीगाव टप्प्यातील सुरक्षा तपासणीला मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) दिल्ली यांनी सुरुवात केली आहे. सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून मेट्रो संचलनाचा मार्ग मोकळा करण्यातील ही शेवटची आणि महत्त्वाची प्रक्रिया असून प्रक्रियेला सुरुवात झाल्याने आता लवकरच या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होईल. तर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाणार आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असून आचारसंहिता संपल्यानंतर जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला दहिसर – काशीगाव मेट्रो धावण्याची शक्यता आहे.


दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी १३.५ किमी लांबीच्या 'मेट्रो ९' मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे. ही मार्गिका दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर – गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेचा विस्तार आहे. मेट्रो ७ मार्गिकेच्या विस्तारामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरे थेट मीरा-भाईंदर शहराशी जोडली जाणार आहेत. या मार्गिकेत १० स्थानकांचा समावेश असून या मार्गिकेच्या बांधकामासाठी ६६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पूर्णत उन्नत मेट्रो मार्गिका असलेल्या या मार्गिकेची कारशेड उत्तन येथील डोंगरी परिसरात असणार आहे. तर या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत केले जात आहे.


दहिसर – काशीगाव आणि काशीगाव – डोंगरी असे हे दोन टप्पे असून सध्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर डिसेंबरअखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या अनुषंगाने एमएमआरडीएने काही महिन्यांपूर्वी सीएमआरएस चाचण्यांना सुरुवात केली. मात्र सीएमआरएस चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने डिसेंबरचा मुहूर्त चुकला. पण आता मात्र नव्या वर्षात दहिसर – काशीगाव मेट्रो
धावणार आहे.

Comments
Add Comment

सांताक्रूझ ते चेंबूर- लिंक रोड कनेक्टरचे काम दोन महिन्यात होणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्सप्रेस हायवे) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यान

मुंबई महापालिकेत पक्ष कार्यालयासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होवून

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत डॉ. भूषण गगराणी राहणार पिठासीन अधिकारी

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी यापूर्वी पिठासीन अधिकारी म्हणून

वांद्र्यात वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी पादचाऱ्यांना स्कायवॉकचा पर्याय

मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वेड्या वाकड्या उभ्या केलेल्या रिक्षा, कचऱ्याचे साम्राज्य तसेच

राज्यातील आयटीआयमध्ये पीएम–सेतू योजना राबविणार

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे पीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला मंगळवारी

परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी