Saturday, January 3, 2026

Devendra Fadanvis : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन

Devendra Fadanvis : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन

सातारा दि. ३ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदी उपस्थित होते.

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक नायगाव येथे दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नायगावनगरी सडा रांगोळीने सज्ज झाली आहे.

Comments
Add Comment