विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत २८६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे एकूण ५४७ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली असून, काही प्रमाणात उमेदवारांची मनधरणी करण्यातही राजकीय पक्षांना यश आले आहे.
वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी विविध राजकीय पक्षाच्या व अपक्ष अशा ९३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील ६४ अर्ज छाननी दरम्यान बाद झाले होते. तर ८३३ अर्ज वैध ठरविण्यात आले होते.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यादिवशी २८६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ५४७ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रभागनिहाय उमेदवार संख्या
- प्रभाग माघार कायम
- ए १८ ४०
- बी १५ ७८
- सी ५० ५९
- डी १५ ६८
- ई ३९ ५०
- एफ ४२ ७४
- जी ४२ ६६
- एच ३७ ५४
- आय २८ ५८






