२०२५ हे वर्ष अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजलं. २०२६ मध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या निकालांमुळे केवळ नवी राजकीय समीकरणेच उदयाला येणार नाहीत, तर राजकीय दशा आणि दिशाही बदलेल, असा दावा केला जात आहे.
२०२६ हे आशावादी आहे. अनेक जुन्या प्रश्नांची उत्तरे देणार. काही महत्त्वाच्या घडामोडींना चिन्हांकित करणार. देशातील राजकारण आणि प्रशासनाला आकार देऊ शकतात. नवे वर्ष हे सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह अनेक पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने पुन्हा एकदा पकड बसवली. झारखंड वगळता दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि बिहारसह अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. त्यामुळे भाजपची वाटचाल अगदी जोमात सुरू आहे. लोकांना मोदी जे बोलतात ते पटले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली असली तरीही तेथे भाजपची कामगिरी नाही. तेथे नॅशनल काॅन्फरन्सच्या कुबड्या पक्षाला हाती घ्याव्या लागल्या आहेत. पण जम्मूमध्ये पक्षाची कामगिरी चांगली आहे. असे असले तरीही १५ जानेवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुका या भाजपसाठी खऱ्या अर्थाने परीक्षाच आहेत. यात भाजपचा खरा कस लागणार आहे. कारण आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले आहेत. जरी राज यांनी मुंबई महापालिकांपुरती ही युती असल्याचे जाहीर केले असले तरीही भाजपला यापासून सावध राहावे लागेल. मुंबई महापालिका ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नव्हे तर आर्थिकदृष्ट्या सर्वात शक्तिशाली पालिका आहे. त्यामुळे तेथे जो कुणी विजय मिळवेल तेथे त्याचा राज्यभर डंका चालेल. म्हणून तर उद्धव ठाकरे यांचा मुंबईसाठी आटापिटा चालू आहे. एकट्या मुंबई पालिकेचे बजेट आहे ३१ हजार कोटी रुपयांचे. यावरून मुबई पालिकेच्या विशाल आकाराचा अंदाज यावा.
भारतातील सर्वात श्रीमंत पालिकेचे नियंत्रण केवळ प्रशासकीय शक्तीच नव्हे तर त्याचे प्रतीकात्मक मूल्य प्रचंड आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर देशात होतील त्या प. बंगाल, आसाम, पुदुचेरी आणि केरळ तसेच तामिळनाडू या राज्यांच्या विधानसभा निवडणुका. येथे भाजप फारसा ताकदवान नाही पण तेथे तो चमत्कार घडवू शकतो. यात प. बंगालची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे आणि तितकीच अवघड आहे. कारण येथे भाजपला बंगालमधील राजकीय ध्रुवीकरणाचा लाभ होत नाही. प. बंगालमध्ये सर्वात लक्षवेधी लढती होणार आहे. तामिळनाडूचे राजकीय परिदृष्य पारंपरिकपणे द्विपक्षीय राहिले आहे. तेथे द्रमुक आणि अण्णा द्रमुक याच दोन पक्षांची सरकारे आलटून पालटून राहिली. जो कुणी सत्तेवर असतो तो विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्य्याचा प्रयत्न करतो. हेच तेथे सातत्याने चालत आले आहे. सत्ताधारी द्रमुकची या भागावर चांगलीच पकड आहे आणि आता तर विभाजित अण्णा द्रमुकमुळे तेथे द्रमुकची पकड आणखी मजबूत झाली आहे. भाजपचा यात फासा कुठेही बोलबाला नाही. केवळ तुलनेने दुर्बल पक्षाला तो हात देऊ शकतो. पण यापेक्षा काही नाही. आसामात मात्र तुलनेने निवडणूक सोपी आहे. कारण तेथील ध्रुवीकरणाचे नेतृत्व भाजपच्या लाभासाठी काम करत आहे. त्यामुळे तेथे विजय सोपा आहे. शिवाय तेथे भाजपने मदरशाना अनुदान बंद केले असून तेथे हिंदूंची शक्ती उभी केली आहे, तिचा भाजपला लाभ होईल. सर्वात महत्त्वाच्या आणि भाजपसाठी अत्यंत अवघड निवडणुका असतील त्या केरळच्या.
केरळमध्ये भाजपला कधीही यश मिळाले नाही. तेथील डावी लोकशाही आघाडी आणि काँग्रेस यांनी भाजपला चंचुप्रवेश करू दिला नाही. पण एक भाजपसाठी आशादायक चिन्ह आहे. कारण केरळातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यात डाव्या लोकशाही आघाडीला धक्का बसला. येत्या निवडणुकात भाजपचा बेत येथे दोन अंकी जागा मिळवण्याचा आहे आणि असे झाले तर भाजपचा तो खूप मोठा विजय ठरेल. या निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीचा पराभव झाल्यास प्रथमच कम्युनिस्टांचा मुख्य़मंत्री राहणार नाही. केरळच्या राजकारणात भाजप आपला ठसा उमटवू पाहत आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष हे प्रमुख घटक पक्ष असल्याने इंडिया गटातील अंतर्गत समीकरणे यामुळे बदलतील असे चित्र दिसू शकते. पण हे झाले राजकीय चित्राचे गणित. पण २०२६ च्या निवडणुकाआधी भाजपचे नेते अमित शहा यांनी भाजप नेत्यांना तळागाळातील नेत्यांना आवाहन करून त्यांना आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले. आसाममध्ये सत्ता मिळवणे भाजपला अवघड जाऊ नये. गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसकडून जबरदस्त लढत मिळाली तर भाजपला ही लढत वाटते तितकी सोपी जाणार नाही हे नक्की. काँग्रेससाठीही येणारे वर्ष कमी आव्हानात्मक असणार नाही. कारण आसाममध्ये परतीकडे आस लावून बसलेली काँग्रेस बंगालमध्ये जवळपास संपल्यात जमा आहे.
काँग्रेसच्या साऱ्या आशा केरळवर एकवटल्या होत्या, पण तेथेही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने बाजी मारून काँग्रेसला पुन्हा एकदा निराशेचे पाणी पाजले. अर्थात काँग्रेसचे स्थानिक नेतृत्वातील वाद आणि संघर्ष यास काही प्रमाणात कारण आहेच. बंगालमध्ये तृणमूल भाजपला सहज विजयाप्रत नेईल असे चित्र आहे. पण याची कल्पना निकाल लागल्यावरच येईल. या राज्यातील निवडणुकांचा निकाल लागल्यावरच हे वर्ष कसे जाईल हे सांगता येईल. अण्णा द्रमुकमध्ये आपसातील संघर्षामुळे स्टॅलिनय यांचे काम सोपे झाले. तसेच बहुतक ठिकाणी आहे. पण भाजपला येथे फारसा वाव नाही. नवीन वर्षाचे आगमन अपेक्षांसह होते. पण यंदा या राज्यांतील विधानसभा निवडणुका ठरवणार आहेत आणि एकूणच राजकीय वाटचाल कशी राहील आणि लोकांचे कल्याण हे कसे साध्य केले जाईल. पण सध्या तरी सारेच चित्र अदृष्य आहे आणि नीट काहीच दिसत नाही. सर्वात आधी मुबई महापालिका निवडणुकांचे निकाल आहेत त्यात जर ठाकरे बंधू अपयशी ठरले तर त्यांची राजकीय वाटचाल अवघड होईल आणि त्यांना दुसरा कसला पर्याय उरणार नाही.