Friday, January 2, 2026

या ब्लॉकबस्टर चित्रपटाने मोडला ६ वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड; नवीन वर्षातही कमाई सुरूच..

या ब्लॉकबस्टर चित्रपटाने मोडला ६ वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड; नवीन वर्षातही कमाई सुरूच..

Avatar Fire And Ash Box Office Collection Day 14: धूरांधरलाही मागे टाकून या ब्लॉकबस्टर चित्रपटाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही तगडी कमाई सुरूच ठेवली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन आठवड्यांत या चित्रपटाने सहा वर्षांपूर्वींचा मोठा रेकॉर्ड मोडला आहे.

अवतार: फायर अँड ॲश' प्रदर्शित होऊन आता तब्बल १४ दिवस पूर्ण झाले आहेत.तरीही चित्रपटाचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ सुरू आहे. चौदाव्या दिवशी या चित्रपटाने २०१९ च्या एका मोठ्या हॉलिवूड चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.हा चित्रपट गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे.इतकंच नव्हे तर या चित्रपटाने मोठमोठे रेकॉर्ड्ससुद्धा मोडले आहेत. २०२५ या वर्षात भारतात प्रदर्शित झालेल्या सर्व हॉलिवूड चित्रपटांच्या कमाईला मागे टाकत 'अवतार: फायर अँड ॲश' पहिल्या क्रमांकाचा हॉलिवूड चित्रपट बनला आहे.नवीन वर्षात प्रवेश करताना या चित्रपटाच्या कमाईत जास्त वाढ झाल्याच निदर्शनास येत आहे.

'अवतार: फायर अँड ॲश'ने पहिल्या आठवड्यात १०९.५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करताना आठव्या दिवशी ७.६५ कोटी आणि नवव्या दिवशी १० कोटी रुपयांची कमाई झाली.अकराव्या आणि बाराव्या दिवशी अनुक्रमे ५ आणि ५.२५ कोटी रुपयांचं कलेक्शन झालं.२०२५ च्या शेवटच्या दिवशी ५.२५ कोटी रुपये कमाई केल्यानंतर प्रदर्शनाच्या१४ व्या दिवशी या चित्रपटाने ६.९ कोटी रुपये कमावले आहेत.यामुळे त्याची एकूण कमाई १६०.३ कोटी रुपये इतकी झाली आहे.हा आकडा पुढे आणखी वाढू शकतो.अवघ्या १४ दिवसांत 'अवतार: फायर अँड ॲश'ने डिस्नेच्या २०१९ च्या 'द लायन किंग' या चित्रपटाच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलं आहे.शाहरुख खान आणि आर्यन खान यांच्या आवाजात डब केलेल्या या चित्रपटाने १५१.१० कोटी रुपयांची कमाई केली होती.

जेम्स कॅमरुनच्या 'अवतार: फायर अँड ॲश'ने अवघ्या १३ दिवसांत तब्बल ७४००० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.या चित्रपटाच्या मागील दोन्ही भागांनी जगभरात दमदार कमाई केली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा