Friday, January 2, 2026

दोन बड्या ब्रँडच्या विलीनीकरणानंतर सफायर फूडसचा शेअर ४% कोसळला

दोन बड्या ब्रँडच्या विलीनीकरणानंतर सफायर फूडसचा शेअर ४% कोसळला

मोहित सोमण: सफायर फूडस (Saphire Foods) व देवयानी इंटरनॅशनल (Devyani International) या दोन कंपन्यांचे विलीनीकरण (Merger) होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर सफायर फूडसचा शेअर सकाळी ४% पातळीवर कोसळला असून देवयानी इंटरनॅशनल कंपनीचा शेअर ४% पातळीवर उसळला आहे. सकाळी १०.०३ वाजेपर्यंत सफायर फूडस शेअर ३.३७% कोसळत २५३.८५ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. तर देवयानी इंटरनॅशनल कंपनीचा शेअर २.८३% उसळत १५१.६० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. काल उशीरा दोन्ही कंपन्यानी स्कीम ऑफ अरेंजमेंट (Scheme of Arrangement) अंतर्गत एक्सचेंज फायलिंगमध्ये संचालक मंडळाच्या बैठकीत दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाला मान्यता दिली असल्याचे म्हटले. त्यामुळे सफायर फूडस शेअरहोल्डरचे शेअर हे पूर्ववत राहणार असून सध्या अस्तित्वात असलेल्या या भागभांडवलधारकांच्या होल्डिंग्समध्ये प्रत्येकी १०० शेअरमागे १७७ शेअर देवयानी इंटरनॅशनल सफायर फूडस शेअरहोल्डरला देणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. यम ब्रँडसह केएमसी, पिझा हट्ट असे लोकप्रिय ब्रँड एका छताखाली आल्याने भारतातील खूप मोठी कंपनी म्हणून उदयास येणार आहे. ९३४ दशलक्ष डॉलर्सचे हे अधिग्रहण असणार आहे.

याविषयी एक्सचेंज फायलिंगमध्ये सफायरने म्हटल्याप्रमाणे, हस्तांतरणकर्ता कंपनीच्या भागधारकांकडे (Saphire Foods) असलेल्या प्रत्येक १०० शेअर असलेल्या २ रूपये दर्शनी मूल्याच्या (Face Value) पूर्णपणे भरणा झालेल्या इक्विटी शेअर्सच्या बदल्यात हस्तांतरिती कंपनीचे (Devyani International) १ रूपये दर्शनी मूल्य असलेल्या व पूर्णपणे भरणा झालेले १७७ (एकशे सत्याहत्तर) इक्विटी शेअर्स देईल असे म्हटले आहे.  १ जानेवारी २०२६ पासून स्कीम ऑफ अरेंजमेंट लागू होणार असून पुढील १५ ते १८ महिन्यात हा संपूर्ण व्यवहार पूर्ण होणार आहे.

अर्थात या व्यवहाराला सीसीआय (Competition Commision of India), बीएसई,एनएसई, दोन्ही कंपन्यांचे भागभांडवलधारक, एनसीएलटी (National Company Law Tribunal NCLT) व संबंधित नियामकांची अंतिम मोहोर बाकी आहे असे कंपनीने म्हटले. त्यामुळे नव्या स्कीमनंतर आर्कटिट इंटरनॅशनल समुह (Devyani International) सफायर फूडसचे १८.५% हिस्सा (Stake) खरेदी करणार आहे. सफायर फूडसने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे ब्रँडचे एकत्रीकरण (Brand Integration धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचे सूचित करण्यात आली आहे. वाढलेली कट टू कट स्पर्धा, व घटत्या मार्जिनचे आव्हान, बदलती परिस्थिती या अशा अनेक कारणांमुळे हा निर्णय दोन्ही कंपन्यांनी घेतला कारण दोन्ही कंपन्या सारख्या व्यवसायात आहेत.

कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतातील विमानतळे आणि रेल्वे स्थानकांसारख्या मर्यादित बाजारपेठा वगळता, KFC आणि Pizza Hut या ब्रँड्स अंतर्गत QSR व्यवसायाचे एकाच संस्थेमध्ये एकत्रीकरण होणार असून ज्यामुळे मोठ्या प्रमाणावरील बचती, दोन्ही ब्रँड्ससाठी एकसंध धोरण आणि ग्राहक प्रस्ताव शक्य होईल, परिणामी वाढ, खर्चात कपात,विक्री आणि सेवा वाहिन्यांचे सुसूत्रीकरण, उत्पादकता वाढीसह वर्धित परिचालन कार्यक्षमता, आणि आर्थिक, व्यवस्थापकीय व तांत्रिक संसाधने, कर्मचारी क्षमता, कौशल्ये, विशेषज्ञता आणि लॉजिस्टिक फायद्यांचे एकत्रीकरण होईल. ज्यामुळे हस्तांतरित कंपनीची स्पर्धात्मक स्थिती मजबूत होईल असे कंपनीने म्हटले.

हस्तांतरणकर्ता (Saphire Foods) कंपनीच्या दक्षिण आणि पश्चिम भारतातील तसेच श्रीलंकेतील प्रादेशिक उपस्थितीचे हस्तांतरित कंपनीच्या अखिल भारतीय कार्यान्वयनासोबत आणि नेपाळ, नायजेरिया व थायलंडमधील आंतरराष्ट्रीय उपस्थितीसोबत एकत्रीकरण, ज्यामुळे एक विस्तारित भौगोलिक व्याप्ती असलेले एकसंध व्यासपीठ कंपनीसाठी तयार होईल असेही कंपनीने यावेळी म्हटले. जे भारतभरातील आणि आंतरराष्ट्रीय प्रदेशांतील ग्राहकांना अधिक सातत्य,कार्यक्षमता आणि सेवेच्या गुणवत्तेसह सेवा देण्यास सक्षम असेल असे कंपनीचे म्हणणे आहे.हस्तांतरणकर्ता कंपनीच्या प्रादेशिक सामर्थ्याचा हस्तांतरित कंपनीच्या स्वतःच्या ब्रँड्ससाठी (बिरयानी बाय किलो, गोइला बटर चिकन आणि वांगो) आणि भारतातील तिच्या विशेष Costa Coffee, Tealive, New York Fries आणि Sanook Kitchen फ्रँचायझींसाठी फायदा घेण्याच्या संधी, ज्यामुळे ग्राहकांच्या निवडीचा विस्तार होईल आणि हस्तांतरित कंपनीच्या ब्रँड पोर्टफोलिओमध्ये विविधता येईल.

कंपनीच्या मते पुरवठादार, जागामालक, तंत्रज्ञान प्रदाते आणि इतर भागधारकांसोबत सौदेबाजीची शक्ती वाढेल, ज्यामुळे व्यावसायिक अटींमध्ये सुधारणा, खर्चात बचत आणि उच्च नफा होईल. एकाच संस्थेला वाढीव व्याप्ती, लक्ष केंद्रित करणे, तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि विस्तारित पोहोच यांचा फायदा होईल ज्यामुळे वाढीच्या अधिक संधी, मोठ्या ग्राहकवर्गाला क्रॉस-सेलिंगच्या अधिक संधी, उत्पादकता आणि परिचालन कार्यक्षमतेत सुधारणा होईल, परिणामी ग्राहक, कर्जदाते, कर्मचारी इत्यादींसाठी मूल्यनिर्मिती होईल आणि रोख प्रवाहाची निर्मिती अधिक मजबूत होईल. तसेच विस्तारित आर्थिक सामर्थ्य आणि व्याप्ती ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात सुलभ प्रवेश मिळेल,अनुकूल अटींवर निधी उभारणी शक्य होईल आणि हस्तांतरित कंपनीच्या वेगवान विस्तार, आधुनिकीकरण आणि वाढीच्या योजनांना पाठिंबा मिळेल. एकाच संस्थेकडे मोठा आणि अधिक तरल इक्विटी आधार असेल, बाजारातील दृश्यमानता सुधारेल आणि गुंतवणूकदारांचा सहभाग व्यापक होईल, ज्यामुळे भागधारकांसाठी मूल्यनिर्मिती होईल असे अंतिमतः कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान अस्तित्वात असलेल्या कुठल्याही शेअरहोल्डरला या व्यवहारात कॅपिटल गेनचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मूल्य आयकर कायद्यानुसार अविरत राहणार आहे. सफायर फूडसचा शेअर गेल्या ५ दिवसात १.८५% उसळला असून गेल्या १ महिन्यात ३.३५% उसळला आहे तर संपूर्ण आर्थिक वर्षात २५.४२%. कोसळला असून इयर टू डेट बेसिसवर कंपनीचा शेअर २.५८% घसरला आहे. देवयानी इंटरनॅशनल कंपनीच्या बाबतीत, शेअर्समध्ये गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ४.५०% वाढ झाली असून गेल्या १ महिन्यात १३.०३% वाढ झाली आहे तर संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये २०.४२% घसरण झाली आहे तर इयर टू डेट बेसिसवर २.३८% वाढ झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >