मोहित सोमण:आतापर्यंत आरबीआयने ९८.३९% दोन हजारांच्या नोटा जमा झाल्याचे स्पष्ट केले आहे. मे १९,२०२३ पर्यंतचा हा आकडा असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले असून आरबीआयने ७ ऑक्टोबर पर्यंत नोटा जमा अथवा बदलण्याची अंतिम मुदत दिली होती. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत १९ मे २०२३ पर्यंत २००० रूपयांच्या नोटांचे सरक्युलेशन (अभिसरण) बाजारात होते ज्यांचे बाजार मूल्यांकन ३.५६ लाख कोटी होते.
आरबीआयने (Reserve Bank of India RBI) १९ मे २०२३ मध्ये २००० रूपयांची नोट रद्द केल्याचे घोषित केले होते. याच धर्तीवर त्यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. आरबीआयच्या माहितीप्रमाणे २९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या अभिसरणातील आणखी ५७४३ नोटा कमी झाल्या आहेत. २००० रुपयांला अद्याप अधिकृत वैध चलन दर्जा दिलेला आहे.
तुम्ही आता २००० रूपयांच्या नोटा बदलू शकाल का?
अद्याप आरबीआयने नोटांचा वैध दर्जा कायम राखल्याने सरकार दरबारी या नोटेला अद्याप मान्यता आहे. मात्र सामान्य माणसाला आता बँकेतून ती नोट बदलता येणार नाही कारण त्याची अंतिम मुदत १९ मे २०२३ होती. त्यापुढे २००० रुपयाची नोट असल्यास अथवा मिळाल्यास ती मात्र ती आरबीआयच्या कार्यालयात बदलता अथवा जमा करता येईल. याव्यतिरिक्त, मध्यवर्ती बँकेने रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय इश्यू ऑफिसेस) १९ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नोटा बदलून घेण्याची सुविधा देखील जाहीर केली आहे. ज्या कोणत्याही व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे अजूनही २००० रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी आरबीआय कार्यालयांमध्ये ती नोट बदलू शकतात. आरबीआयची कार्यालये असलेल्या अहमदाबाद, बंगळूर, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम शहरात नागरिक २००० नोटा जमा करु शकणार आहेत. आरबीआयच्या उपलब्ध माहितीनुसार याव्यतिरिक्त व्यक्ती देशातील कोणत्याही टपाल कार्यालयातून आपल्या २००० रुपयांच्या नोटा इंडिया पोस्टद्वारे रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही कार्यालयात पाठवू शकतात व त्या आपल्या बँक खात्यात जमा करून घेऊ शकतात.






