लंडन : सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील ट्रेनमधील एक फोटो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक भारतीय व्यक्ती ट्रेनमध्ये समोसे विकताना दिसत आहे. ही व्यक्ती धोतर, कुर्ता घालून समोसे विकत आहे. ते पाहून सर्वांना आनंद झाला आहे.
समोसे हा असं पदार्थ आहे जो आपण कधीही खाऊ शकतो ,जो भारताच्या कानकोपऱ्यात कुठेही मिळतो. मग ते बसमध्ये असू नाहीतर ट्रेनमध्ये प्रवास करताना समोसा तुम्हाला सर्वत्र मिळेल. पण आश्चर्याची बाब म्हणजे आता आता लंडनच्या ट्रेनमध्येही भारताचे समोसे मिळू लागले आहेत? सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे भारतीय आनंदित झाले आहेत आणि त्याचे कारण आहे समोसा. खरे तर, लंडनच्या एका ट्रेनमध्ये भारताचा प्रसिद्ध समोसा विकला जाताना दिसतो आहे. हे पाहून लोक केवळ आश्चर्यचकितच झाले नाहीत तर त्यांना अभिमानही वाटत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची सुरुवात लंडनच्या एका रेल्वे प्लॅटफॉर्मपासून होते. या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसते आणि तिथेच एक भारतीय व्यक्ती पूर्ण देसी स्टाइलमध्ये धोतर आणि कुर्ता घालून, तसेच डोक्यावर गमछा बांधून समोसे विकताना दिसतो. मग ट्रेन येते आणि प्लॅटफॉर्मवर थांबताच तो समोसे घेऊन त्यात चढतो आणि विकायला सुरुवात करतो. ट्रेनमध्ये असलेल्या अनेक प्रवाशांनी त्याचे समोसे विकत घेतले, ज्यात भारतीयही होते आणि त्यांनी समोस्यांची खूप प्रशंसा केली. समोसे विकणारी ही व्यक्ती स्वतःला बिहारी समोसे वाला सांगताना दिसत आहे. हा बिहारी समोसेवाला आता लंडनमध्येही प्रसिद्ध झाला आहे.
कोण आहे हा बिहारी समोसेवाला?
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर biharisamosa.uk नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत १० मिलियन म्हणजे १ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच जवळपास ५ लाख लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की ‘आता लंडनमध्येही समोसा मिळतोय, याहून मोठा आनंद काय असू शकतो.’ दुसऱ्या एका यूजरने, ‘समोसा आता आंतरराष्ट्रीय स्टार झाला आहे’ असे म्हटले. तर दतिसऱ्या एका युजरने हेही विचारले की ‘लंडनच्या ट्रेनमध्ये हे सर्व विकण्याची आणि खाण्याची परवानगी आहे का?’ आणखी एका युजरने कमेंट करत, ‘मला वाटतं त्याने लंडनची ट्रेन भारतीय ट्रेन समजली होती’ असे म्हटले आहे.






