Friday, January 2, 2026

मुंबईत मनसेने दिले सहा अमराठी उमेदवार, मराठी इच्छुकांवर अन्याय

मुंबईत मनसेने दिले सहा अमराठी उमेदवार, मराठी इच्छुकांवर अन्याय

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उबाठा सोबत मनसेने युती केल्यानंतर मराठी भाषा आणि मराठी माणूस या मुद्दयावर निवडणूक लढवत आहे. एका बाजुला भाजपाला अमराठी उमेदवार दिल्याने आरोप केले जात असतानाच मराठीच्या मुद्दयावर निवडणूक लढवायला निघालेल्या मनेसेने सहा अमराठी नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मराठीच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे अमराठी माणसांना उमेदवारी द्यायची यामुळे मनसेचा खरा चेहराच समोर येत आहे.

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसे युती झाली असून मराठीच्या मुद्दयावर हे दोन्ही भाऊ एकत्र आले आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने मराठी माणसांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे, मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला अशाप्रकारचे चित्र दोन्ही पक्षांकडून निर्माण केले गेले. परंतु एका बाजुला भाजपावर अमराठी उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप करणाऱ्या मनसेकडून अमराठी व्यक्तींना उमेदवारी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

मनसेच्या वाट्याला ५३ जागा आल्या असून त्यातील प्रभाग क्रमांक २१मधून सोनाली देव मिश्रा, प्रभाग क्रमांक७४मधून विद्या भरत आर्य, प्रभाग क्रमांक ८१मधून शबनम शेख, प्रभाग क्रमांक ११० हरिनाक्षी मोहन चिराथ,ज्योती राजभोज, प्रभाग १८८ आरीफ शेख,प्रभाग २०९मधून हसीना माहिमकर आदींना उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे यासर्व ठिकाणी मनसेला मराठी चेहऱ्यांना संधी देता आली असती, परंतु आता अमराठी चेहऱ्यांना संधी देत अमराठी माणसांना उमेदवारी दिली जात असताना मराठी माणसांनी नक्की काय विश्वास ठेवावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. भांडुपमधील ११४ हा मनसेचा गड असताना तिथे मराठी अनिषा माजगावकर यांचा पत्ता कापला आणि ही जागा उबाठाने आपल्याकडे ठेवली,दुसरीकडे ११० हा मतदार संघ उबाठाने मनसेला सोडला आणि तिथे अमराठी चेहऱ्याला संधी देण्यात आली. त्यामुळे मराठी माणसांना संधी देण्यात येणारे प्रभाग सोडून अमराठी उमेदवारांना संधी देणारे प्रभाग राज ठाकरे यांच्या मनसेने स्वीकारल्याने मनसेला मराठी माणसांवर बोलण्याचा अधिकार आहे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. मराठी पदाधिकाऱ्याला उमेदवारी मिळावी म्हणून भांडुपमध्ये प्रभाग ११४करता मनसेने हट्ट का धरला नाही असाही सवाल केला जात आहे.

Comments
Add Comment