'महायुतीचा हिंदू आणि मराठीच महापौर होईल'

मुंबई : भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या विधानाचा विपर्यास करून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात नेरेटिव्ह तयार केले जात असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महापौर भूमिका स्पष्ट केली आहे. "मुंबईचा पुढचा महापौर महायुतीचाच, हिंदू आणि मराठीच होईल. मुंबईचे मराठीपण आणि हिंदुत्वाची संस्कृती कायम राहील, यात कोणतीही तडजोड होणार नाही", असे त्यांनी ठासून सांगितले.


मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केळवे. फडणवीस म्हणाले, "कृपाशंकर सिंह मीरा-भाईंदरमध्ये जे बोलले, ते मुंबईबाबत नव्हते. ते आमचे अधिकृत प्रवक्ते नाहीत. माध्यमांनी त्यांच्या मीरा-भाईंदरमधील विधानाला मुंबईशी जोडले. मात्र, मी पक्षाचा नेता म्हणून अधिकृतपणे सांगतो की, मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल. तो हिंदू होईल आणि मराठीच होईल."



"मुंबईत पूर्वी बाहेरून मजूर यायचे, आता वेगवेगळ्या राज्यांतील लोक येतात. पण मुंबईचे 'मुंबईपण' कुणीही घालवू शकत नाही. गणेशोत्सवात पारंपरिक मराठी पद्धतीनेच उत्सव साजरा होतो. मुंबईची संस्कृती टिकवणे ही आमची जबाबदारी आहे. मुंबईची वाटचाल इकडे-तिकडे जाऊ देणार नाही." मराठी मतदारांबाबत बोलताना ते म्हणाले, "मराठी व्होटबँक दुसऱ्यांची आहे असे समजू नका. मराठी मतदार आमचे आहेत. जर मराठी माणसांनी भाजपला मतं दिली नसती, तर सलग तीन निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार इतक्या मोठ्या प्रमाणात निवडून आले नसते. भाजप हा क्रमांक एकचा पक्ष आहे. मराठी-अमराठी सगळेच आमचे मतदार आहेत. कुणीही कुठूनही आले तरी मुंबईचे मराठीपण कायम राहील", असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.



ठाकरे २००९ मध्ये एकत्र आले असते तर निकाल वेगळा असता



  1. - ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करताना फडणवीस म्हणाले, "ही युती खूप उशिरा झाली आहे. दोघांची मते संपल्यावर हे एकत्र आले आहेत. २००९ मध्ये एकत्र आले असते तर निकाल वेगळा आला असता. आता एकत्र येऊन काही फायदा नाही. दोघांच्या मतांची टक्केवारी इतकी कमी आहे की, मराठी किंवा अमराठी माणूस त्यांना मते देणार नाही. या दोघांची आम्हाला काही चिंता नाही. आम्ही निश्चितपणे जिंकू. त्यांचे प्राबल्य एकाच ठिकाणी आहे, तिथेही आमची मते हलली नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत."

  2. हिंदुत्व आणि मराठी अस्मितेवर बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले, "हिंदुत्व आणि मराठी वेगळे होऊ शकत नाहीत. हे बाळासाहेब ठाकरे यांनीच सांगितले आहे. प्रत्येक मराठी माणूस हिंदुत्ववादी आहे. आम्ही हिंदुत्व सोडू शकत नाही. मात्र, विकासावर बोलता येत नाही, काही दाखवायचे नसल्यामुळेच ठाकरे गट भावनिक मुद्दे पुढे करत आहे. आमची हिंदुत्वाची ठाम भूमिका आहे, पण त्यावर मते मागत नाही. आम्ही केलेला विकास आणि कामे सांगतो", असेही फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Virar Missing Girl : विरारमधील बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाला नवे वळण, पोलिसांनी 'लव्ह जिहाद'चा दावा फेटाळला

विरार : विरारमधील अल्पवयीन मुलगी बेपत्ता (Missing) झाल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुलगी एका तरुणासोबत जात

SIR : 'एसआयआर' प्रक्रियेत नाव वगळल्यास मतदाराला मिळणार पुन्हा संधी

१७ ऑगस्टला प्रारूप यादी; १६ सप्टेंबरपर्यंत पुनर्नोंदणीची मुदत मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार

Lok Sabha : लोकसभेचे कामकाज पुन्हा स्थगित, सार्वजनिक परीक्षा संशोधन विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधकांचा गदारोळ

नवी दिल्ली : संसदेच्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी लोकसभेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत

Ganpati Special Train: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा; 246 विशेष गाड्या धावणार, मुंबई-कोकण प्रवास होणार सुलभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला

Bank of Baroda : 'बँक ऑफ बडोदा'च्या एक टीबी डेटाची चोरी; ग्राहकांची माहिती, वैयक्तिक तपशील आणि कागदपत्रे डार्क वेबवर उपलब्ध

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील देशातील एक अग्रेसर आणि महत्त्वाची बँक असलेल्या 'बँक ऑफ बडोदा'चा (Bank of Baroda)तब्बल १

Water Worship : तब्बल चार वर्षानंतर महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलपूजन

नाशिक : नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर गंगापूर धरणातील जलपूजनाचा