हेमंत ढोमेच्या सिनेमाची धडाकेबाज कमाई ; लवकरच पार करणार १ कोटींचा आकडा

KJVMM Box Office: वर्षाच्या पहिल्याच दिवशी मराठी शाळेतल्या पोरांनी बॉक्स ऑफिस गाजवलं


मुंबई: महाराष्ट्रात आज 'मराठी भाषा' अभिजात झाली, याचा अभिमान महाराष्ट्रात मिरवला जातो; पण त्याच वेळी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा एकामागोमाग एक बंद पडत चालल्या आहेत.या विसंगतीवर बोट ठेवणारा, थेट प्रश्न विचारणारा आणि अंतर्मुख करणारा सिनेमा म्हणजे 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम', लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यानं हा सिनेमा केवळ कथा म्हणून नाही, तर सामाजिक वास्तव दाखवणारा आरसा म्हणून उभा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांच्या ' क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ' या सिनेमाची चर्चा सुरू होती. मल्टीस्टाटर सिमेमाच्या टीझरला आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. आता नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मने जिंकली असून बॉक्स ऑफिसवरही जोरदार कमाई केली आहे. मराठी शाळांच्या मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या या संवेदनशील विषयाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.


नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वरही जोरदार कमाई केली आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाची कथा ही मराठी शाळेवर आहे . त्यामुळे प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हेमंत ढोमे याने अत्यंत गंभीर विषयाला कौटुंबिक मनोरंजनाची जोड दिली आहे. सिनेमात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर युट्यूबर आणि बॉलिवूड अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिनं या सिनेमातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलंय.



पहिल्या दिवसाची कमाई


या चित्रपटानं पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ७८.४३ लाखांचा जोरदार गल्ला जमवला आहे. वर्षाच्या सुरुवातीला सुट्टीचा दिवस असल्यानं मुंबई, पुणे आणि कोल्हापूर सारख्या शहरांमधील मल्टिप्लेक्समध्ये अनेक शो 'हाऊसफुल' पाहायला मिळाले. आश्चर्याची बाब म्हणजे बॉलिवूडचा धुरंधर सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिस ऑफिसवर आहे. त्यातच इक्कीस हा सिनेमाही प्रदर्शित झालाय. त्यामुळं या दोन मोठ्या सिनेमांना टक्कर देत 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' या सिनेमानं पहिल्याच दिवशी समाधानकारक कमाई केली आहे.



काय आहे सिनेमाची कथा?


रायगड जिल्ह्यातील एका ९० वर्षे जुन्या मराठी शाळेला वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांचा हा भावनिक प्रवास प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळाली.कथानक हे अलिबाग नागांव येथील मराठी माध्यमाच्या शाळेभोवती फिरतं. ९० वर्षे जुनी असलेली ही शाळा आता पाडली जाणार आहे. त्या ठिकाणी 'इंटरनॅशनल स्कूल' उभी केली जाणार आहे. मात्र ही केवळ एका शाळेची गोष्ट नाही, तर महाराष्ट्रातील असंख्य मराठी शाळांची व्यथा सांगणारा हा चित्रपट आहे.

Comments
Add Comment

पैशाचं सोंग कमी पडलं...!

भालचंद्र कुबल, पाचवा वेद आम्हा नाट्यनिरीक्षकांना सालाबादप्रमाणे यंदाही मागील वर्ष नाट्यसृष्टीस कसं गेलं? याचा

निर्मितीवस्था आणि पंचनायिका...!

राज चिंचणकर, राजरंग रंगभूमीवर नाटक सादर होत असताना, रंगमंचाच्या मागे दुसरे नाट्य घडत असते आणि त्या नाट्याचा

दीपिकाला सोडून आता संदीप रेड्डी वांगांच्या ‘स्पिरिट’मध्ये ‘नॅशनल क्रश’ ची एंट्री

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

प्लंबिंगपासून ते दिग्दर्शनापर्यंतचा प्रवास, ‘रुबाब’मधून मराठी सिनेसृष्टीत नव्या दिग्दर्शकाची एन्ट्री

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नवनव्या विषयांसोबतच स्वतःच्या संघर्षातून घडलेले नवे दिग्दर्शक आपली ओळख निर्माण

अभिनेता शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात ..त्या निर्णयामुळे शाहरुख खान अडचणीत ?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असलेले नाव आहे.मात्र,आता शाहरुख खान मोठ्या अडचणीत फसला.हेच नाही तर

धर्मेंद्र यांच्या अखेरच्या सिनेमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद ; पहिल्याच दिवशी तंगडी कमई

Ikkis Box Office : प्रेक्षकवर्ग हा आतुरतेने हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत होता.कारण या चित्रपमध्ये सगळ्यांचे