Ikkis Box Office : प्रेक्षकवर्ग हा आतुरतेने हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत होता.कारण या चित्रपमध्ये सगळ्यांचे आवडते कलाकार धर्मेंद्र हे आहेत.धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट "इक्किस" हा १ जानेवारी रोजी, म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रदर्शित झाला आहे.चित्रपटाला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे "इक्किस"ने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली.गेल्या २८ दिवसांपासून "धुरंधर" आणि "अवतार: फायर अँड अॅशेस" चे बॉक्स ऑफिसवर वर्चस्व होते.याशिवाय इतर चित्रपट देखील स्वतःला बॉक्स ऑफिसववर टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत.परिणामी, "इक्किस " चा पहिल्या दिवशीचा परफॉर्मन्स चांगला होता.
इक्किस हा चित्रपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे.अगस्त्य नंदाने १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात वयाच्या २१ व्या वर्षी शहीद झालेल्या अरुण खेत्रपाल यांचे पात्र साकारले आहे.त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र, देशाचा सर्वोच्च लष्करी सन्मान, प्रदान करण्यात आला, ज्यामुळे ते हा सन्मान मिळवणारे सर्वात तरुण सैनिक ठरले.
इक्किसची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत होता.कारण यावेळी सर्वांच्या नजरा अगस्त्य नंदावर होत्या.दरम्यान,ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले,ज्यामुळे हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला,जो पाहण्यासाठी लोक उत्सुक होते.हा चित्रपट श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केला आहे.इक्किस पाहिल्यानंतर लोक भावुक झाले आणि सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करू लागले.इक्किस मध्ये जयदीप अहलावत देखील आहेत,तो पाकिस्तानी सैन्याचे ब्रिगेडियर ख्वाजा मोहम्मद नसीर यांची भूमिका करताना दिसतोय. त्यांनीच युद्धादरम्यान अरुण खेत्रपाल यांना शहीद केले होते. त्यानंतर ते लाहोरमध्ये अरुणच्या वडिलांना भेटले आणि त्यांच्या शौर्याला सलाम केला. त्यांनी अरुणच्या वडिलांना असेही सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलाला मारले होते, परंतु त्यांच्या मुलामुळे पाकिस्तान युद्धात हरला. धर्मेंद्र यांनी इक्किसमध्ये अरुणच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.
इक्किस 'चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन
इक्किस ने पहिल्या दिवशी ७ कोटींची कमाई केली.अगस्त्य नंदाने या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले असल्याने हा एक चांगला आकडा मानला जातो.दरम्यान, कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांच्या 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ७.७५ कोटींची कमाई केली.येत्या काळात इक्किस किती कमाई करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.ऑक्युपन्सीच्या बाबतीत, पहिल्या दिवशी हिंदीमध्ये त्याने एकूण ३१.९४ % कमाई केली.इक्किसचे बजेट अंदाजे ४०-६० कोटी रुपये आहे.