मुंबई : निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष शर्थीचे प्रयत्न करत असतानाच, मुंबईत ठाकरे बंधूंना (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) मोठा राजकीय धक्का बसला आहे. विशेषतः मुंबईतील मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या वांद्रे परिसरातील प्रभाग क्रमांक ९७ आणि ९८ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) ११ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत.
नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, या राजीनामा सत्रामागे दोन प्रमुख कारणे समोर येत आहेत: हा प्रभाग जागावाटपात ठाकरेंच्या उमेदवाराकडे गेल्याने स्थानिक मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. आपल्या हक्काची जागा दुसऱ्याला दिल्याची भावना या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. या प्रभागात मनसेने दिलेला उमेदवार स्थानिक कार्यकर्त्यांना मान्य नाही. "बाहेरचा" किंवा "अपात्र" उमेदवार लादल्याचा आरोप करत ११ पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. एककीडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी दिवसरात्र एक करत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सभांचा धडाका सुरू असतानाच, स्वतःच्या बालेकिल्ल्यात पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे ही चिंतेची बाब मानली जात आहे. वांद्रे हा परिसर राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असल्याने, या राजीनाम्यांचा फटका मतदानावर होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून या नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी घेतलेली ही टोकाची भूमिका ठाकरे बंधूंच्या विजयाच्या समीकरणात अडथळा ठरू शकते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांताक्रूझ येथील उपविभाग अध्यक्ष विजय काते, शाखा अध्यक्ष जितेंद्र गावडे, शाखा सचिव भाऊराव विश्वासराव, उपशाखा अध्यक्ष विजय कुलकर्णी, ॲड. अशोक शुक्ला, नरेंद्र कौंडीपूजला, प्रविण पाटील, रोहित गोडीया, अजय कताळे, दत्ताप्रसाद देसाई, मनविसे उपविभाग अध्यक्ष… pic.twitter.com/Q7oMDEygVl
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 2, 2026
निष्ठावंतांनी सोडली 'राज' साथ
पालघर : मागील काही वर्षांपासून राज्यात शहरांची व जिल्ह्यांची नावे बदलण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. तसाच मुंबईत अनेक स्थानकांची ही नावे बदलण्यात ...
वांद्रे येथील प्रभाग क्रमांक ९७ मध्ये मनसेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटल्याने आणि तिथे 'मशाल' चिन्हाचा उमेदवार असल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. प्रभाग ९७ मध्ये भाजपने हेतल गाला यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून बाळा चव्हाण 'मशाल' चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी बाळा चव्हाण यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवत भाजपचा हात धरला आहे. अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले हे पदाधिकारी आता भाजपच्या हेतल गाला यांचा प्रचार करणार आहेत.
प्रभाग ९८ मध्येही असंतोषाचा भडका
केवळ प्रभाग ९७ नव्हे, तर शेजारील प्रभाग ९८ मध्येही मनसेला अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागत आहे. या प्रभागातून मनसेने दीप्ती काते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या उमेदवारीला कडाडून विरोध आहे. दीप्ती काते यांच्या नावाला विरोध दर्शवत अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून, पक्षाने चुकीचा उमेदवार लादल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एककीडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जोर लावत असतानाच, वांद्रे पश्चिममधील या घडामोडींनी दोघांच्याही अडचणी वाढवल्या आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलेले राजीनामे आणि केलेला पक्षप्रवेश यामुळे या दोन्ही प्रभागांतील चुरस आता अधिक वाढली आहे.
मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी
वार्ड क्र. ८ - कस्तुरी रोहेकर वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने वॉर्ड क्र. १४- पुजा कुणाल माईणकर वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा वॉर्ड क्र. २३- किरण अशोक जाधव वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर वॉर्ड क्र. ३६- प्रशांत महाडीक वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके वॉर्ड क्र. ४६- स्नेहिता संदेश डेहलीकर वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई वॉर्ड क्र. ७४- विद्या भरत आर्य वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी वॉर्ड क्र. ८५- चेतन बेलकर वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे वॉर्ड क्र. १०३- दिप्ती राजेश पांचाळ वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज वॉर्ड क्र. ११९- विश्वजीत शंकर ढोलम वॉर्ड क्र. १२८- सई सनी शिर्के वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे वॉर्ड क्र. १४६- राजेश पुरभे वॉर्ड क्र. १४९- अविनाश मयेकर वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळे वॉर्ड क्र. १६६- राजन मधुकर खैरनार वॉर्ड क्र. १७५- अर्चना दिपक कासले वॉर्ड क्र. १७७- हेमाली परेश भनसाली वॉर्ड क्र. १७८- बजरंग देशमुख वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके वॉर्ड क्र. १८८- आरिफ शेख वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी वॉर्ड क्र. २०७ – शलाका हरियाण वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर वॉर्ड क्र. २१२- श्रावणी हळदणकर वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव वॉर्ड क्र. २१६- राजश्री नागरे वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर वॉर्ड क्र. २२३ – प्रशांत गांधी वॉर्ड क्र. २२६- बबन महाडीक






