मुंबई अग्निशमन दलाकडून २ हजार ७०३ आस्थापनांची तपासणी, १३६ विरोधात कारवाई*

मुंबई : नववर्ष निमित्ताने आयोजित स्वागत सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाकडून २२ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुंबई महानगरात ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हाती घेण्यात आली. या अंतर्गत, मुंबईतील २ हजार ७०३ आस्थापनांची अग्निसुरक्षाविषयक तपासणी करण्यात आली. त्यापैकी, अग्निसुरक्षाविषयक अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३६ आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली. तर, ३० डिसेंबर २०२५ रोजी रात्री ‘जी दक्षिण’ विभागाकडून लोअर परळ भागातील कमला मिल व शक्ती मिल परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत ८ अवैध व्यावसायिक एलपीजी सिलिंडर, २०० किलो कोळसा, १३५ लीटर खाद्यतेलासह अन्य सामग्री जप्त करण्यात आली. तरीही, नववर्षाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून अग्निसुरक्षेबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे विविध आस्थापनांनी पालन करावे. तसेच, नागरिकांनी सतर्कतेने स्वागत सोहळा साजरा करावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.


नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मुंबईतील विविध हॉटेल्स्, पब, बार, गृहसंकुल व इमारती, समुद्रकिनारा आदी ठिकाणी विविध कार्यक्रम व स्वागत सोहळ्यांचे आयोजन केले जाते. यासाठी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर, अग्निसुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २२ डिसेंबर २०२५ ते दिनांक २८ डिसेंबर २०२५ दरम्यान ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबविण्यात आली.


तथापि, मोहिमेचा कालावधी संपल्यानंतरही महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य, इमारत व कारखाने, अतिक्रमण निर्मूलन आदी विभागांच्या सहाय्याने मुंबई अग्निशमन दलाकडून विविध आस्थापनांची नियमितपणे तपासणी सुरुच आहे. आस्थापनांनी अग्निसुरक्षेबाबतच्या अटी व शर्तींचे अनुपालन केले नसल्याचे आढळून आल्यास, त्यांच्यावर ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६’च्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत, २२ डिसेंबरपासून दिनांक ३० डिसेंबर २०२५ दरम्यान २ हजार ७०३ आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली. त्यापैकी, अग्निसुरक्षेशी संबंधित अटी व शर्तींचे पालन न करणाऱ्या १३६ आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली. तर, ५५ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तपासणी करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये ३८ मॉल्स, ५१ पंचतारांकित हॉटेल्स, १९४ लॉजिंग-बोर्डिंग, ३७ रूफ टॉप, ३२५ पब, बार, क्लब, ३७ पार्टी हॉल, २८ जिमखाना, १९९३ रेस्टॉरंट आदी मिळून एकूण २ हजार ७०३ आस्थापनांचा समावेश आहे.


३० डिसेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास ‘जी दक्षिण’ विभागाकडून लोअर परळ परिसरातील कमला मिल व शक्ती मिल परिसरातील १५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत ८ अवैध व्यावसायिक एलपीजी सिलिंडर, २०० किलो कोळसा, तळघरात साठवून ठेवलेले १३५ लीटर खाद्य तेल, १ ग्रीझलर, ३ मायक्रोवेव्ह ओव्हन, ११ सॉस गॅलन आदी सामग्री जप्त करण्यात आली. दरम्यान, ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ संपुष्टात आली असली तरी अग्निसुरक्षेच्या अनुषंगाने विविध आस्थापनांची नियमितपणे तपासणी सुरूच राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नवीन वर्षाच्या अनुषंगाने आयोजित केल्या जाणाऱ्या विविध सोहळ्यांदरम्यान सर्व आस्थापनांच्या संचालकांनी किंवा आयोजकांनी या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच, नागरिकांनीही सोहळा साजरा करताना सतर्क राहावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि