मागणी तीन जागांची, मांडवली एकाच जागेवर

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसेमध्ये युती झाल्यानंतर आपला गड असलेल्या माहिम विधानसभेत तीन जागांची मागणी मनसेने केली होती. परंतु प्रत्यक्षात जागा वाटपाता मनसेच्या वाट्याला एकमेव दादरमधील प्रभाग क्रमांक १९२ आला आहे. त्यामुळे मागणी तीन जागांची झाली असली तरी प्रत्यक्षा उबाठाने मनसेला केवळ एका जागेवर गुंडाळून आपल्या पदरात दोन जागा पाडून
घेतल्या आहेत.


पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसे आणि उबाठाची युती झाल्यानंतर माहिम विधानसभेतील प्रभाग क्रमांक १९०, प्रभाग क्रमांक १९२ आणि प्रभाग क्रमांक १९४ वर मनसेने दावा केला होता. अन्य विधानसभांमध्ये मनसेच्या वाट्याला एखादी जागा दिली गेली तरी चालेल पण माहिममध्ये तीन जागा दिल्या जाव्यात यासाठी मनसे आग्रही होती. परंतु तीन जागांची मागणी असतानाच प्रभाग क्रमांक १९० आणि प्रभाग क्रमांक १९४ मनसेला सोडण्यास उबाठा तयार झाले होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक १९२ हा आपल्याकडे कायम राखण्यात उबाठा यशस्वी ठरली होती. परंतु प्रभाग क्रमांक १९४मधून मनसेच्यावतीने यशवंत किल्लेदार यांना निवडणूक लढवण्यास कठिण जाईल आणि उबाठाचे उमेदवार असलेले निशिकांत शिंदे यांचा पत्ता कट होईल. या भीतीने मनसेने प्रभाग क्रमांक १९२ पुन्हा मागून धेतला आणि प्रभाग क्रमांक १९४ उबाठाला सोडण्याची तयारी दर्शवली. परंतु, शेवटच्या क्षणाला मनसेच्या वाट्याला तीन जागांपैंकी केवळ दोन जागा मिळणार होत्या, तिथे प्रभाग क्रमांक १९४ पाठोपाठ प्रभाग्र क्रमांक १९०ही गेला. त्यामुळे प्रभाग क्रमांक १९२ हा एकमेव राहिला आणि त्याठिकाणी मनसेच्यावतीने यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी जाहीर होवून त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला आहे.


त्यामुळे या विधानसभेत मनसेला तीन जागा दिल्या गेल्या असत्या तर तिन्ही जागांवर मनसेचे उमेदवार निवडून येणे शक्य झाले असते. तर या विधानसभेतील दोन प्रभाग हे मनसेच्या अधिक ताकदीवर उबाठाला निवडून आणणे शक्य झाले असते. त्यामुळे या विधानसभेत उबाठा आणि मनसे युतीचे पाचही उमेदवार निवडून येणे शक्य होते, परंतु उबाठाने महत्वाच्या जागा नाकारल्याने मनसेमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Comments
Add Comment

OBC certificate : सुप्रिया सुळे, विखे पाटलांसह बड्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र

- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा; महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे मुंबई : जलसंपदा मंत्री

Maharashtra politics : भाजप प्रवेशासाठी निघालेले उबाठा गटाचे नगरसेवक रातोरात शिंदेंच्या शिवसेनेत दाखल

- भाजप-शिवसेनेत राजकीय नाट्य; खासदार ओमराजेंकडून राणा पाटलांना धोबीपछाड मुंबई : धाराशिव शहरात नगरसेवकांच्या

TMC MPs notice : टीएमसीच्या २० बंडखोर खासदारांना लोकसभा अध्यक्षांची नोटीस

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) २० बंडखोर खासदारांना नोटीस बजावली आहे.

D. K. Shivakumar : 'वंदे मातरम्'च्या पूर्ण गायनाला काँग्रेसचा विरोध, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दोन कडव्यांच्या निर्णयावर ठाम

बेंगळुरू: ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण गायनाला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला असून,

Kriti Sanon Controversy : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीने घेतलं राजकीय वळण; राहुल गांधींच्या समर्थनानंतर कंगना रणौतचा टोला

मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता राजकीय वळणावर पोहोचला आहे.

Basuri Swaraj : ‘पितृसत्ता मोडून काढा’ म्हणणाऱ्या राहुल गांधींवर बासुरी स्वराज संतापल्या

नवी दिल्ली : अभिनेत्री कृती सॅनॉनच्या रक्षाबंधन विशेष दागिन्यांच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता थेट