मोहित सोमण: आयशर मोटर्स कंपनीची सूचीबद्ध (Listed) नसलेली कंपनी वीई कर्मशिअल व्हेईकल (VE Commerical Vehicles Limited) कंपनीची वाहन विक्री आकडेवारी घोषित झाली आहे. कंपनीने सियाम (Society of Indian Automobile Manufacturers) प्रदर्शित केलेली आकडेवारी आज एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केली आहे त्यानुसार कंपनीच्या डिसेंबर विक्रीत इयर ऑन इयर बेसिसवर २६% वाढ झाली आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्षात इयर टू डेट (YTD) बेसिसवर ही वाढ १३.६% झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आकडेवारीनुसार, ईव्हीसह ट्रक बस यांच्या विक्रीत गेल्या डिसेंबर तुलनेतील ८०३५ तुलनेत या डिसेंबर महिन्यात १०१७७ कोटींवर वाढ नोंदवली गेली आहे. तर इयर टू डेट बेसिसवर गेल्या वर्षीच्या ५९६४१ तुलनेत या वर्षी ६७७६२ पातळीवर वाढ झाली आहे. मात्र एकूणच उपलब्ध माहितीनुसार, ट्रक, व्होल्व्हो बस यांच्या एकूण विक्रीत गेल्या वर्षीच्या डिसेंबरमधील २८९ तुलनेत या डिसेंबर महिन्यात २०७ पातळीवर वाढ झाली आहे. त्यामुळे ही घसरण २८.४% होती. उपलब्ध माहितीनुसार इयर टू डेट बेसिसवर ही घसरण ०.५% झाली असून गेल्या वर्षीच्या १८४५ तुलनेत या वेळी १८३५ वर किरकोळ घसरण झाली आहे.
माहितीनुसार कंपनीमध्ये निर्यातीत इयर ऑन इयर बेसिसवर २०२४ मधील ४९० तुलनेत ६५० पातळीवर वाढ झाली आहे. तर इयर टू डेट बेसिसवर निर्यात २०२५ मध्ये गेल्या वर्षीच्या ३५१४ तुलनेत ५३१५ पातळीवर वाढ झाली आहे. त्यामुळे ही डिसेंबर महिन्यातील वाढ ३२.७% असून इयर टू डेट बेसिसवर ५१.३% वाढली आहे.
महिंद्रा अँड महिंद्रानेही आपला डिसेंबर महिन्यातील विक्री जाहीर केली असून त्यांच्या डिसेंबरमधील विक्रीत २५% अधिक वाढ झाली आहे. एम अँड एम (Mahindra and Mahindra) डिसेंबर महिन्यात ३७% वाढ नोंदवली आहे. वीएसटी टिलर्स शक्ती (VST Tillers Tractors) कंपनीच्या विक्रीत डिसेंबर महिन्यात २९.७७% वाढ झाली असून एसकोर्ट कुबोटा (Escorts Kubota) कंपनीच्या डिसेंबर विक्रीत ३८.५% वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात सीयामने (SIAM) ने दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली होती. खासकरून प्रवासी वाहनात इयर ऑन इयर बेसिसवर १८.७% व व्यवसायिक वाहनात (Commercial Vehicle) इयर ऑन इयर बेसिसवर किरकोळ वाढ कायम होती. पीव्ही विक्री १८.७%, दुचाकी विक्री २१.२%, तीनचाकी (२१.३%) वाढली होती.
उर्वरित कंपन्याही आज ऑटोमोबाइल कंपन्या रोजी संपलेल्या महिन्याचा आणि वर्षाचा विक्री डेटा जाहीर करणार आहेत. आणि ब्रोकरेज कंपन्यांच्या मते जीएसटीतून मिळालेले फायदे, आरबीआयने केलेल्या व्याजदर कपाती, नवीन उत्पादन श्रेणी, निर्यातीवर आधारित विक्री आणि अर्थव्यवस्थेतील तरलतेच्या आश्वासनामुळे त्या महिन्यासाठी मजबूत विक्रीची अपेक्षा आहे. तज्ञांच्या मते २०२६ मधील ऑटोमोबाईल विक्री मजबूत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






