Wednesday, December 31, 2025

आजचे Top Stocks Picks- उत्तम परतावा हवाय? मग मोतीलाल ओसवाल व मेहता इक्विटीकडून एकूण 'हे' ६ शेअर खरेदी करण्याचा सल्ला

आजचे Top Stocks Picks- उत्तम परतावा हवाय? मग मोतीलाल ओसवाल व मेहता इक्विटीकडून एकूण 'हे' ६ शेअर खरेदी करण्याचा सल्ला

प्रतिनिधी: वर्षाच्या शेवटाला शेअर बाजार आला असताना अखेरच्या दिवशी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस व मेहता इक्विटीचे रियांक अरोरा यांनी काही शेअर उत्तम परताव्यासाठी सुचवले आहेत. जाणून घेऊयात कुठले शेअर ठरणार परताव्यासाठी फायदेशीर -

१) V Mart Retail- वी मार्ट रिटेल कंपनीच्या शेअरला मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने बाय कॉल दिला असून ७१५ रूपये प्रति शेअर सर्वसामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) सह सुचवली असून मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज मते, हा शेअर ४५% अपसाईड म्हणजेच संभाव्य वाढीसह अपेक्षित आहे. ब्रोकरेजने लक्ष्य किंमत (Target Price TP) ७१५ रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

२) Shriram Finance Limited- श्रीराम फायनान्स कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ९७९ रूपये प्रति शेअरची सीएमपी दिली असून २०% अपसाईडसह ब्रोकरेजने ११८० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

३)KFin Technologies- केफिन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी १०९२ रूपयाला निश्चित केली आहे. तसेच ब्रोकरेजला १०% अपसाईडला शेअर अपेक्षित असून ब्रोकरेजने लक्ष्य किंमत १२०० रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

४) VA Tech Wabag- वीए टेक वाबॅग कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून १२७१ रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित केली आहे. तसेच ब्रोकरेजने शेअर ४९% अपसाईड वाढ अपेक्षित केली असून लक्ष्य किंमत १९०० रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

मेहता इक्विटीचे आजचे स्टॉक्स पिक्स -

५) NMDC- कंपनीच्या शेअरला मेहता इक्विटीजने बाय कॉल दिला असून कंपनीने सीएमपी ८३.४१ रूपये निश्चित केली आहे. तसेच ब्रोकरेजकडून ८८ ते ९२ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे. तसेच स्टॉप लॉस ८० रुपयांवर ठेवण्याचे सूचवले गेले आहे.

६) Hero Motocorp- हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी ५७११ रूपये निश्चित करण्यात आली असून ५९०० ते ६०५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >