‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार अंदाजासह आयकॉनिक गेम शो कौन बनेगा करोड़पतिच्या सेटवर पोहोचली. या शोचे सूत्रसंचालन मेगास्टार अमिताभ बच्चन करत आहेत. हॉट सीटवर मोना सिंह आणि वीर दास दिसले, तर या भागात मिथिला पालकर आणि शरीब हाशमी यांचाही सहभाग आहे. हा एपिसोड ज्ञान, विनोद आणि बेधडक गप्पांचा सुरेख संगम सादर करणार असून सिनेमा आणि टेलिव्हिजनप्रेमींसाठी तो नक्कीच पाहण्यासारखा अनुभव ठरणार आहे.


अलीकडेच प्रदर्शित झालेल्या हॅप्पी पटेल: खतरनाक जासूसच्या ट्रेलरने मजा एका नव्या पातळीवर नेली आहे. उच्च दर्जाच्या विनोदाने भरलेल्या या ट्रेलरमध्ये अनेक मनोरंजक आणि अनोखे क्षण पाहायला मिळतात, जे पूर्णपणे एंटरटेनिंग चित्रपटाचे आश्वासन देतात. दिग्दर्शक आणि अभिनेता या दुहेरी भूमिकेत वीर दास आपल्या ताज्या, क्वर्की कॉमेडी स्टाइलसह भरपूर हसवण्यासाठी सज्ज आहेत. ऊर्जा, आकर्षण आणि युथफुल वाइबने भरलेला हा ट्रेलर चित्रपटाच्या रिलीजबद्दलची उत्सुकता आणखी वाढवतो. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस चे दिग्दर्शन वीर दास यांनी केले असून हा चित्रपट १६  जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

Dhurandhar 2:धुरंदरमध्ये 2 दिसणार हा अभिनेता..,प्रेक्षकांचा उत्साह वाढणार..

धुरंधर २: हिंदी चित्रपटसृष्टीत नुकताच प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी

अंगावर काटा येणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित, भूमी पेडणेकरची भूमिका थरकाप उडवणारी

मुंबई : सिरीयल किलरच्या कथांवर आधारित थ्रिलर नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. याच धाटणीतील एक नवी वेब सिरीज

Bigg Boss Marathi 6 :बिग बॉस मध्ये राधा पाटीलचा मोठा खुलासा; तीन वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिप कबुली

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी सीझन ६ मधील स्पर्धक व नृत्यांगना राधा पाटील सध्या बिग बॅासच्या घरात आणि बाहेरही चर्चेचा

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा

रणपति शिवराय स्वारी आग्रा टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा मुंबई :  छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि

२०२६ प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला (शनिवार/रविवार) ओटीटी वर येणारे प्रोग्राम

या प्रजासत्ताक दिनी, धैर्य, न्याय, ओळख आणि बदल दर्शविणाऱ्या कथा पुन्हा एकदा पाहून स्वातंत्र्याचा सन्मान करूया.

धुमधडाक्यात प्रसाद ओकच्या मुलगा साखरपुडा संपन्न; कोण आहे होणारी सून ?

गेल्या काही दिवसांपासून मराठी फ्लीट इंडस्ट्रीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रसाद