आज संपूर्ण जगभरात मध्यरात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. २०२६ नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. सरत्या वर्षाला निरोप देत सर्वचजण धम्माल, मज्जा, मस्ती, खाणंपिणं, नाचत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करतात.तुमच्या सोबतच तुमच्या नातेवाईकांना , मित्र-मैत्रिणिंना या सर्वांमध्ये नवीन वर्षाच्या मराठमोळ्या, हटक्या शुभेच्छा, संदेत पाठवून नातं अधिकच घट्ट करू शकता.
आपल्या सुखात आणि दुःखात सोबत असलेल्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबाला आणि नातेवाईकांना जेव्हा आपण मनापासून शुभेच्छा देतो, तेव्हा त्या नात्यांमधील ओलावा अधिक वाढतो.एक छोटासा शुभेच्छा संदेश सुद्धा कोणाच्या तरी चेहऱ्यावर हासू फुलवू शकतो आणि त्यांना आयुष्यातील नवीन आव्हाने पेलण्यासाठी बळ देऊ शकतो.नवीन वर्षाचे स्वागत करणे म्हणजे केवळ सेलिब्रेशन करणे नव्हे, तर आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक सुवर्णसंधी असते. म्हणूनच, या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही खास आणि निवडक 'New Year Wishes'. हे संदेश तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करून त्यांचे नवीन वर्ष अधिक आनंदमयी आणि उत्साही बनवू शकता. चला तर मग, जुन्या कटू आठवणींना निरोप देऊया आणि एका नवीन ऊर्जेने, सकारात्मकतेने या नूतन वर्षाचे स्वागत करूया!
२०२६ नववर्षाच्या हटके शुभेच्छा प्रियजनांना द्या!
१ सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा, नवी उमेद व नावीन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू. आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांक्षा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
२ गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा-अपेक्षा घेऊन आले २०२६ साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
३ येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या दिनी४ प्रत्येक सकाळ आनंदाने सुरू होवो नव्या दिवसाचा नवीन ऊर्जेने स्वागत करा संपूर्ण वर्ष यशस्वी जावो आयुष्याचा प्रत्येक क्षण खास ठरो
५ दुःखं सारी विसरून जाऊ .. सुखं देवाच्या चरणी वाहू … स्वप्नं उरलेली.. नव्या या वर्षी नव्या नजरेनं नव्यानं पाहू… नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
६ नवीन वर्ष आपणास सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो! नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना!
७ ३१ तारखेला फक्त मजा करा अन् नवीन वर्षात भरपूर काम करा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
८ पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
९ तुमच्या नात्यांना नवा बहर लाभो मित्रांची साथ आणि कुटुंबाचं प्रेम सतत लाभो प्रत्येक स्वप्नाला यशाचा कोंदण लाभो तुमचं आयुष्य आनंदाने फुलून राहो
१० नवीन वर्ष तुम्हाला नवीन प्रेरणा देईल तुमच्या प्रत्येक इच्छेला सत्याचा मार्ग दाखवेल संपूर्ण जीवन आनंदाने भरून टाकेल तुमचं यश सतत वाढत जावो
११ माझी इच्छा आहे की येणारे १२ महिने सुख मिळो ५२ आठवडे यश आणि ३६५ दिवस मजेदार जावोत माझ्या मित्र-मैत्रिणींना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
१२ नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयंनव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं नवी नाती, नवं यश, नवा आनंदकधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष…!हॅपी न्यू ईअर
१३ येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी..! नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
१४ इडा, पिडा टळू दे नवीन वर्षात माझ्या मित्रांना काय हवं ते मिळू दे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
१५ दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
१६ सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद, नाविन्याची कास धरत, नवीन वर्षाचं स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
१७ नव्या वर्षाचे आगमन संस्कृती आपली जपूया देव- थोरा-मोठ्यांच्या चरणी, मस्तक आपले झुकवू या, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
१८ सरतं वर्ष जातंय आपल्यापासून दूर शंका- कुशंका, राग-रुसवे नव्या वर्षात संपून जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
१९ भोवर्यातून बाहेर पडून किनारा मिळाला, जगण्याला आज एक नवा अर्थ मिळाला, चढ-उतारांनी भरलेले होते हे वर्ष, या नव्या वर्षी तुमची साथ मिळावी, हीच आशा... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
२० मनामनातून आज उजळले आनंदाचे लक्ष्य दिवे… समृध्दीच्या या नजरांनी घेऊन आले वर्ष नवे…. आपणांस व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
२१ हे आपल नातं असंच राहु दे, मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहु दे खूप सुंदर असा प्रवास होता २०२५ वर्षाचा २०२६ मध्येही अशीच सोबत कायम राहू दे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
२२ नवीन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
२३ सर्वांच्या हृदयात असुदे प्रेमाची भावना, नव्या वर्षात पूर्ण होऊ दे अधुरी ही कहाणी, हीच प्रार्थना होऊन नतमस्तक, गरिबांना मिळू दे अन्न- वस्त्र आणि निवारा
२४ हे नातं सदैव असंच राहो, मनात आठवणींचे दिवे कायम राहो, खूप प्रेमळ होता २०२५ चा प्रवास, अशीच राहो २०२६मध्येही आपली साथ
२५ नवीन वर्ष प्रकाश बनून आलंय आपल्या जीवनात, या वर्षात उजळून जाऊदे भाग्याची ही रेषा, परमेश्वराची कृपा राहो सर्वांवरती खास, तुमच्या उपस्थितीने लखलखुदे हे जीवन आज, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
२६ पाकळी-पाकळी भिजावी, अलवार त्या दवाने, फुलांचेही व्हावे गाणे, असे जावो वर्ष नवे, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
२७ हे नववर्ष तुमच्यासाठी ठरो आनंदाची पर्वणी, आयुष्यातील प्रत्येक क्षण उजळू दे क्षणोक्षणी, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!






