रामदास आठवले यांचे बंड २४ तासांत झाले थंड - मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; भाजप-शिवसेना कोट्यातून १२ जागा मिळणार असल्याचा दावा

मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या जागावाटपात सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत महायुतीला धक्का देणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे बंड अवघ्या २४ तासांत थंड झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आठवले यांनी माघार घेतली असून, भाजप आणि शिवसेनेच्या कोट्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) किमान १२ जागा सोडण्याचे ठरल्याचा दावा त्यांनी केला.


मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बुधवारी वर्षा निवासस्थानाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, आरपीआयने महायुतीकडे १७ जागांची अंतिम यादी सादर केली. त्यापैकी भाजपच्या कोट्यातील ६-७ आणि शिवसेनेच्या कोट्यातील ६-७ अशा एकूण १२ जागा सोडण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी संमती दिली आहे. याबाबत फडणवीस यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांना निर्देश दिले आहेत. शिवसेना कोट्यातील उर्वरित जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार आहे.


या १२ जागांवर आरपीआयचे उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून लढतील आणि तेथील भाजप-शिवसेना उमेदवार माघार घेतील. उर्वरित १८ जागांवर (आरपीआयच्या ३० पैकी) स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत होईल. मुंबईच्या एकूण २२७ जागांपैकी उर्वरित १९७ जागांवर आरपीआय महायुतीचा घटकपक्ष म्हणून प्रचार करेल आणि महायुती उमेदवारांना पाठिंबा देईल, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

‘जर्मन बेकरी’प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदार याचा गोळीबारात मृत्यू

श्रीरामपूर : पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा मुंबई : - नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे,

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

केंद्रीय मंत्रिमंडळाची नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

नवी दिल्ली :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ

२९ महापालिकांच्या निवडणुकीत तब्बल ३३ हजार ६०६ अर्ज

एका जागेसाठी सरासरी १२ उमेदवार रिंगणात; पुण्यात सर्वाधिक चुरस, मुंबईत अडीच हजार उमेदवार मुंबई : राज्यातील २९