मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५ जानेवारी रोजी मुंबई, ठाणेसह २९ महापालिकाध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व नोकरदार वर्गास भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५(बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र काही निवडणुकांमध्ये काही संस्था/आस्थापना त्यांच्या कामगारांना मतदानाची भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत असे आढळून आले. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागते.१५ जानेवारी रोजी मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

सांताक्रूझ ते चेंबूर- लिंक रोड कनेक्टरचे काम दोन महिन्यात होणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्सप्रेस हायवे) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यान

मुंबई महापालिकेत पक्ष कार्यालयासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होवून

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत डॉ. भूषण गगराणी राहणार पिठासीन अधिकारी

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी यापूर्वी पिठासीन अधिकारी म्हणून

वांद्र्यात वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी पादचाऱ्यांना स्कायवॉकचा पर्याय

मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वेड्या वाकड्या उभ्या केलेल्या रिक्षा, कचऱ्याचे साम्राज्य तसेच

राज्यातील आयटीआयमध्ये पीएम–सेतू योजना राबविणार

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे पीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला मंगळवारी

परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी