Wednesday, December 31, 2025

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मशाल चिन्हाचे नामोनिशाण संपुष्टात आणल्यानंतर पुन्हा एकदा मशालीची धगधगती ज्योत पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्याचाच पत्ता उबाठाने पध्दतशीरपणे कापला. वडाळ्यातील प्रभाग क्रमांक १७८मधून उबाठाच्या माधुरी मांजरेकर या इच्छुक उमेदवार म्हणून आणि भावी नगरसेवक म्हणून ओळखल्या जात होत्या, एवढेच नाही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही त्यांना उमेदवारीची शंभर टक्के हमी दिली होती. त्यामुळे हा प्रभाग खुला झाल्यामुळे त्यांनी याठिकाणी लढण्याची तयारी करत प्रचार रथ तसेच वाहनांची व्यवस्था केली, प्रचारसाहित्य खरेदी केले, तसेच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रतिज्ञापत्रही तयार केले. पण पक्षाचा अधिकृत उमेदवार अर्ज मिळवण्याची वेळ आली तेव्हा मातोश्रीने त्यांना ठेंगा दाखवला आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्वांनाच जोरदार धक्का दिला. त्यामुळे या प्रभागात मशाल विझल्याने इंजिनला हे नाराज कार्यकर्ते किती धक्का मारतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

वडाळ्यातील प्रभाग क्रमांक १७८मधून उबाठाच्या वतीने माधुरी मांजरेकर यांची उमेदवारी पक्की मानली जात होती आणि विभागातील सर्व पदााधिकारी आणि शिवसैनिक कामालाही लागले होते. त्यामुळ माधुरी मांजरेकर यांची उमेदवारी पक्की असतानाच उबाठाने हा प्रभाग मनसेला आंदण देवून टाकला. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत हा प्रभाग मनसेकडून घेण्याची मागणी उबाठाच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी करूनही उबाठाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हा प्रभाग मनसेला सोडण्यावर ठाम होते. त्यामुळे त्यांनी हा प्रभाग मनसेला सोडल्यामुळे माधुरी मांजरेकर यांचा उध्दव ठाकरे यांनी केला.

माधुरी मांजरेकर आणि राकेश शिंदे यांच्यासह काही पदाधिकारी रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर होते, तिथे त्यांच्या पदरी निराशाच पडली. मांजरेकर यांनी माध्यमांशी बोलतांना, हा प्रभाग मी पुन्हा बांधला आणि पक्षप्रमुखांनी मला उमेदवारी देण्याचे वचन दिले होते. त्यानुसार आरक्षण जाहीर झाल्यानंतर पुन्हा कामाला लागलो. यासाठी प्रचाररथाची आखणी केली, प्रचारासाठी वाहने घेतली. प्रचाराचे साहित्य जमा केले. तसेच उमेदवारी अर्जासाठीचे प्रतिज्ञापत्रही तयार केले होते. केवळ पक्षाच्या ए, बी फॉमची प्रतीक्षा होती. पण सर्व तयार झाल्यानंतर पक्षाने हा प्रभाग मनसेला सोडला आणि निष्ठावान शिवसैनिकांचा घात केला. मनसेला हा प्रभाग सोडल्यानंतर मनसेनेही हा प्रभाग नको असे सांगितले. तरीही हा प्रभाग मनसेला सोडण्यात आला. त्यामुळे हा प्रभाग जाणीवपूर्वक मनसेला देण्यात आल्याचेही मांजरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

Comments
Add Comment