मोहित सोमण: जीपीटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स लिमिटेड (GPT Infrastructure Projects Limited) कंपनीच्या शेअरला ६६९.२० कोटींची ऑर्डर मिळाल्याचे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केल्याने कंपनीच्या शेअर्समध्ये आज ६% अप्पर सर्किट इंट्राडे उच्चांकावर वाढ नोंदवली आहे. दुपारी ३.१६ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ४.८३% वाढ झाल्याने कंपनीचा शेअर १११.५५ रूपयांवर व्यवहार करत आहे. फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जोधपूर राजस्थान येथे चार पदरी रस्ता बांधण्याचे कंत्राट कंपनीने जिंकले आहे. तसेच दोन कंपनीत प्रकल्पाचे कंत्राट वाटले जाणार असल्याचे कंपनीने आपल्या माहितीत म्हटले. त्या वाटणीत जीपीटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ५१% भागीदारी असल्याचेही कंपनीने सेबीचा कायदा ३० कलम अ सूची ३ अंतर्गत स्पष्टीकरण फायलिंगमध्ये दिले.
ही सूचीबद्ध कंपनी आहे. जीपीटी समुहाची प्रमुख होल्डिंग्स असलेल्या जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडही कोलकाता येथील एक मोठी पायाभूत सुविधा कंपनी समजली जाते. १९८० मध्ये स्थापन झालेली जीपीटी इन्फ्रा ही अग्रगण्य मूलभूत अथवा पायाभूत सुविधा पुरवणारी कोलकात्यातील महत्वाची कंपनी समजली जाते.येथील जीपीजीपीटी इन्फ्रास्ट्रक्चर ही पायाभूत सुविधा कंपनी आपल्या दोन विभागांद्वारे कार्यरत आहे, ते म्हणजे म्हणजे पायाभूत सुविधा आणि स्लीपर आहे. ही कंपनी रेल्वेवर केंद्रित पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक प्रस्थापित कंपनी आहे जी सरकारी कंत्राटांसाठी रेल्वे आणि रस्त्यांसाठी नागरी आणि प्रामुख्याने पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या, विशेषतः मोठे पूल आणि आरओबीच्या अंमलबजावणीमध्ये गुंतलेली आहे. स्लीपर विभागात, कंपनी भारत आणि आफ्रिकेतील रेल्वेसाठी काँक्रीट स्लीपरचे उत्पादन आणि पुरवठा करते.
कंपनीच्या शेअर्समध्ये आज ६% पातळीपर्यंत वाढ झाली होती. मात्र गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये १.९७% घसृम झाली असून एक महिन्याच्या कालावधीत कंपनीचा शेअर ०.०४% घसरला आहे तर महिन्यातील आधारावर कंपनीचा शेअर ०.१२% घसरला आहे. इयर टू डेट (YTD) बेसिसवर कंपनीचा शेअर २१.९१% घसरला आहे. तत्पूर्वी १० डिसेंबरला कंपनीने ११९ कोटींची निविदा जिंकल्याने कंपनीचा शेअर ५२ आठवड्यातील ११५ रूपये प्रति शेअर या नव्या उच्चांकावर पोहोचला होता. त्यावेळी कंपनीच्या शेअर्समध्ये ९.५२% वाढ झाली होती. सध्याचे कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १३८७ कोटी रुपये आहे
कंपनीने पहिल्या तिमाहीत (Q1FY26) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ३१३ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता, जो Q4FY25 मधील ३८१ कोटी रुपयांच्या तुलनेत मात्र तिमाही बेसिसवर (Quarter on Quater QoQ) पातळीवर १७.८% कमी आहे. परंतु पहिल्या तिमाहीत (Q1FY25 )मधील २४२ कोटी रुपयांच्या तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर २९.३% वाढ झाली आहे. तिमाहीत घट होऊनही टेक्निकल दृष्टीनेही मजबूत वार्षिक वाढ दर्शवत आहे.
उपलब्ध माहितीनुसार कंपनीचा निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर १३.६% वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या २२ कोटी तुलनेत तो २५ कोटींवर वाढला आहे. तसेच तिमाही बेसिसवर १३.६% आणि १६ कोटी रुपयांवरून इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ५६.३% वाढला. तज्ञांच्या मते, हे निरोगी कमाईची गती दर्शवते. कंपनीचे १६ चे पी/ई (Price to Equity) गुणोत्तर उद्योगाच्या सरासरी २२.३६ पेक्षा कमी आहे जे प्रतिस्पर्धकांच्या तुलनेत आकर्षक मूल्यांकन सूचित करते. आर्थिक माहितीनुसार, कंपनीने तीन वर्षांच्या कालावधीत नफ्याचा सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) ४९%, विक्रीचा सीएजीआर २१% आणि आरओईचा सीएजीआर १८% नोंदवला जो तांत्रिक पातळीवर स्थिरता दर्शवत असल्याने गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठा प्रतिसाद दिल्याचे आढळून आले. शेअर आर्थिक कामगिरीसह सुधारित परतावा दर्शवत असल्याने मोठ्या प्रमाणात आज या शेअर्समध्ये मागणी निर्माण झाली होती.






