नवी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाची एकमेकांसोबत लढतीची शक्यता

उमेदवारी अर्जांचा भरणा


नवी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र ठरलेल्या नवी मुंबईत महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप आणि शिंदेसेना एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र तयारी सुरू असल्याने युती तुटण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी नवी मुंबईत तब्बल तीन तास तळ ठोकत वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी युती व उमेदवार निवडीबाबत चर्चा केली. मात्र, याचवेळी भाजपने वाशी आणि सीवूड्स भागात शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकांविरोधात सक्षम उमेदवार उभे करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस येथील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देत थेट रणशिंग फुंकण्यात आले.


ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ आदी उपनगरांमध्ये भाजप तसेच काही ठिकाणी शिंदेसेनेच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई आणि ठाण्यात भाजप–शिंदेसेना युतीचे सकारात्मक चित्र असताना नवी मुंबईतही युती व्हावी, यासाठी शिंदेसेनेकडून दबाव होता. मात्र नवी मुंबई हा आपला बालेकिल्ला असल्याने येथे कोणत्याही परिस्थितीत युती नको, अशी ठाम भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली होती. महापालिकेवर स्वबळावर सत्ता आणण्याची क्षमता असल्याचा दावा त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर मांडला होता.


दुसरीकडे, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांमध्ये युतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. मात्र युतीच्या चर्चा पुढे सरकत असतानाच नवी मुंबईत भाप आणि शिंदेसेनेतील विसंवाद वाढत गेला.


समन्वय समितीच्या बैठकीत भाजपकडून शिंदेसेनेला अवघ्या २० जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याने तणाव आणखी वाढला. त्यानंतर युती तुटण्याचे संकेत स्पष्ट झाले होते. अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीस काही तास शिल्लक असतानाच त्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याच्या दिशेने घडामोडी वेगाने सुरू झाल्या. भाजपने १११ प्रभागांमध्ये उमेदवारांची अंतिम यादी तयार केल्याचे सांगितले जात असून, शिंदेसेनेनेही सर्व प्रभागांतील उमेदवारांची यादी सज्ज ठेवल्याचे समजते.

Comments
Add Comment

Navnath Ban : आदिवासी शाळांच्या अनुदानावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल

मुंबई : आदिवासी आश्रमशाळा, विद्यार्थ्यांना मिळणारे अनुदान आणि शाळांमधील कथित गैरप्रकारांवरून महाराष्ट्रातील

BJP Vs Congress : राहुल गांधींच्या पत्रावर भाजपचा पलटवार

- आदिवासी शाळांमधील गैरकारभारासाठी काँग्रेस नेतेच जबाबदार; राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मुद्यावर राजकारण

Sharad Pawar : शरद पवारांनी बोलावली कार्यकारिणीची तातडीची बैठक

- दोन्ही राष्ट्रवादीत घडामोडींना वेग; २९ ऑगस्टच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबई : पार्थ पवार आणि शरद

Maharashtra Cabinet Decisions : नागपूरमध्ये लता मंगशेकर विद्यापीठ, खेळाडूंच्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा यांसह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचे

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आतापर्यंत साडेबारा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दहा हजार ११५ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीच्या लाभाचे वितरण

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र

DCM Eknath Shinde : कर्जमाफीचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात; आतापर्यंत १० हजार कोटींची मदत

मुंबई : शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत असून,