Wednesday, December 31, 2025

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत

मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या बसथांब्यावर बरामार्ग क्र.ए- ६०६, बस क्रमांक ०७१५, (ओलेक्ट्रा वेट-लिज) ही बसगाडी भांडुप रेल्वे स्थानक (प.) ते नरदास नगर दरम्यान जात असताना भांडुप रेल्वे स्थानक (प) या बसथांब्यावर बसगाडी येत असताना बस चालकाचा बसवरील अचानक ताबा सुटला व बसगाडी बसथांब्यावर रांगेत बसच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या प्रवाशांवर जाऊन धडकली परिणामी, बसथांब्यावर रांगेत उभे असलेले एकूण १४ प्रवाशी गंभीर जखमी झाले. त्यामध्ये ३ महिला प्रवाशी व एक पुरुष प्रवासी उपचारादरम्यान मृत पावले व १० प्रवाशी गंभीर जखमी झाले आज बेस्ट उपक्रमातर्फे मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली.

जखमींना पालिकेच्या राजावाडी व सायन, रुग्णालयात तसेच, काही जखमी प्रवाशांना अगरवाल, फोर्टीज, महावीर, मिनाज या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सदर बसगाडीवर कार्यरत असलेले, बसचालक संतोष रमेश सावंत, वय वर्षे ५२ यांच्याविरुध्द त्यांच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालविल्याने सदर अपघातास कारणीभुत ठरल्यामुळे भांडुप पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक ११०२/२०२५. भा न्या. सं क्र. १०५,११०,१२५(अ). १२५ (ब), मो. वा. अधिनियम १८४ या कलमांअंतर्गत गुन्हा नोंद करुन सदर बसचालकास अटक करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाने या दुर्दैवी अपघातातील मृत व्यक्तिंना अपघातातील जखमींना योग्य ती वैद्यकीय मदत करण्यात येणार असून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांस प्रत्येकी रु.२ लाख आर्थिक मदत बेस्ट तर्फे देण्यात येणार आहे . सदर अपघात प्रकरणाची तातडीने विभागांतर्गत समितीमार्फत चौकशी आदेश देण्यात आले आहेत . बेस्ट अपघातग्रस्त रुग्णांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट

भांडूप रेल्वे स्थानकाजवळ कालच्या दुर्दैवी बस अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना मुलुंडच्या येथील अगरवाल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आज रुग्णालयात रुग्नांना व नातेवाईकांची भेट घेऊन मुंबई उपनगर पालकमंत्री एँड आशिष शेलार यांनी विचारपूस केली. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करुन उपचारात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या. यावेळी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, सत्यवान नर उपस्थित होते.

बेस्ट बस अपघातातील मृत आणि जखमींची माहिती

  • १४ जखमींपैकी ४ जणांचा मृत्यू , ९ जण विविध रुग्णालयात उपचार सुरु, एकाला डिस्चार्ज
  • घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार १) प्रणिता रासम मृत) २) प्रशांत लाड यांना हॉस्पिटमधून सोडण्यात आले आहे.
  • डामा डिस्चार्ज मुलुंड येथील अगरवाल रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, १) वर्षा सावंत मृत २) मानसी गुरव मृत) ३) प्रशांत शिंदे मृत
  • प्रकृती स्थिर असलेल्या जखमींमध्ये १) नारायण कांबळे, २) मंगेश दुखंडे, ३) ज्योती शिर्के तर सायन रुग्णालयात १) शीतल हाडवे,२) रामदास रुपे , फोर्टिज हॉस्पिटल मध्ये १) प्रताप कोरपे
  • मुलुंड येथील हिरा मोंगी रुग्णालय १) रवींद्र घाडीगावकर,भांडूप येथील मिनाझ रुग्णालयात दिनेश सावंत, पूर्वा रासम ही १२ वर्षाची मुलगी आहे

बेस्ट प्रशासन व कंत्राटदराच्या निष्काळजीपणा: कामगार संघटनांचा आरोप

कालचा भांडुपचा बेस्ट अपघात अत्यंत दुर्दैवी असून बेस्टच्या हलगर्जीपणा व कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचे बेस्ट कामगार संघटनांतर्फे सांगण्यात आले .या अपघातावर बोलताना भाजपा बेस्ट कामगार संघाचे कार्याध्यक्ष सुनील गणाचार्य म्हणाले की काल जो अपघात घडला त्या बस बद्दल वारंवार तक्रारी करूनही ती बस दुरुस्ती करण्यात आली नाही आणि त्याचा बळी रस्त्यावरील पादचारीच नव्हे तर त्या कंत्राटदाराच्या बसवर कार्यरत असलेले बेस्टचे बस चालक ठरले आहेत . आज या कंत्राटदारांची मनमानी एवढी वाढली आहे की वारंवार तक्रारी करूनही त्यांच्या बेस्ट बस या दुरुस्त केल्या जात नाहीत . तर बेस्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते बस चालक व वाचकास दमबाजी करून बस गाड्या आगारा बाहेर काढतात त्यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत . म्हणून या अपघाताला बेस्ट प्रशासन व कंत्राटदार जबाबदार आहेत . या कंत्राटदाराच्या बस गाडीवर कंत्राटदाराचा चालक असणे अपेक्षित होते मात्र कंत्राटदारांकडे बस चालक उपलब्ध नसल्याने बेस्टच्या बस चालकांना या कंत्राटदारांच्या बस गाड्यांवर जबरदस्तीने काम करावे लागत आहेत अत्याधुनिक व ऑटोमॅटिक पद्धतीने चालणाऱ्या बस गाड्या बेस्ट बस चालकांना चालवण्यास मोठी कसरत करावी लागते त्यात वारंवार तक्रार करूनही त्यांची तक्रारींची दखल घेतली जात नाही त्यामुळे बेस्ट मधील कर्मचारी संतप्त झाले आहेत बेस्ट उपक्रमाने या अपघाताची जबाबदारी घ्यावी व कंत्राटदारांवर व सदर व्यक्तींवर कारवाई करी करावी अशी मागणी गणाचार्य यांनी केली आहे. तर आपण काही महिन्यांपूर्वी बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांना भेटलो असून त्यात स्वमालकीच्या बस गाड्या घ्याव्यात अश्या मागण्या केल्या असून त्यात मिडी बस घ्याव्यात अशी सूचना केली असल्याचे नारायण राणे प्रणित बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस विलास पवार यांनी सांगितले व आपण याचा नियमित पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले .

Comments
Add Comment