Wednesday, December 31, 2025

परवा घसरण काल वाढ पुन्हा घसरण सोन्याचांदीत नक्की चाललंय काय? एक दिवसात सोने ३.५३% व चांदीत ७% घसरण वाचा,आजचे दर विश्लेषणासह

परवा घसरण काल वाढ पुन्हा घसरण सोन्याचांदीत नक्की चाललंय काय? एक दिवसात सोने ३.५३% व चांदीत ७% घसरण वाचा,आजचे दर विश्लेषणासह

मोहित सोमण: आज सोन्याच्या दरात घसरण व चांदीच्या दरात बदल झालेला नाही. सोन्यातील अस्थिरता कायम असताना चांदीतही पराकोटीची अस्थिरता दिसून आली आहे. याचाच परिणाम म्हणून २९ डिसेंबरला सोने चांदी सर्वोच्च स्तरावर पोहोचले असताना परवा एका दिवसात सोन्याचांदीत मोठी घसरण झाली ज्यामध्ये प्रति किलो चांदी २१००० पेक्षा अधिक स्तरावर घसरली होती काल पुन्हा एकदा सोन्याचांदीत काल वाढ झाली असताना आज मात्र सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून चांदीचे दर भारतीय बाजारात 'जैसे थे' असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात आज ९८ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७३ रूपये घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३५२२, २२ कॅरेटसाठी १२३९५, १८ कॅरेटसाठी १०१४२ रुपयांवर पोहोचले आहेत. प्रति तोळा दर पाहिल्यास २४ कॅरेटमागे ९८० रुपये, २२ कॅरेटसाठी ९०० रूपये, १८ कॅरेटसाठी ७३० रुपये घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३५२२० रूपये, २२ कॅरेटसाठी १२३९५० रूपये, १८ कॅरेटसाठी १०१४२० रूपयांवर पोहोचले आहेत.

भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Mutli Commodity Exchange MCX) बाजारात सोन्याच्या दरात ०.९७% घसरण झाल्याने दरपातळी १३५३३६ रुपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.४७% घसरण झाली असून जागतिक मानक (World Standard) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.७१% घसरण झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ४३११.७५ औंसवर गेली आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या निर्देशांकात ३.५३% घसरण झाल्याने सोने कालपासून १३४९४२ पातळीच्या आसपास व्यवहार करत आहे.

एमसीएक्समध्ये एमसीएक्स सोन्याचा फेब्रुवारीचा वायदा (Futures) दर आज सत्राच्या सुरुवातीलाच ०.७७% घसरून १३५६१८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. त्यामुळे युएस व्याजदरातील कपातीच्या पुन्हा वाढलेल्या आशावादावर गोल्ड स्पॉट मागणीत कालपर्यंत झालेली घसरण आजही कायम राहिली आहे.विशेषतः युएस रशिया युक्रेन यांच्यातील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असल्याने काही काळ सोन्याचा पुरवठा अखंडित राहिला. आज पुरवठा मोठ्या प्रमाणात मागणीपेक्षा पुरेसा राहिल्याने किरकोळ किंमतीवर सोने घसरले आहे. आज युएस बाजारात १० वर्षाच्या यिल्डमध्ये वाढ झाल्याने बाजारातील व्याजदर कपातीवरील आशावाद वाढला. परिणामी आज डॉलरच्या पातळीत वाढ झाली.

चांदीच्या दरातही आज स्थिरता!

चांदीच्या दरातही तुफान पराकोटीची अस्थिरता असताना मात्र काहीशी स्थिरता आज चांदीला प्राप्त झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात व प्रति किलो दरात कुठलाही बदल झाला नसल्याने प्रति ग्रॅम दर २४० रुपयांवर कायम राहत प्रति किलो दर २४०००० रूपयांवर कायम आहे. कमोडिटी बाजारात तर सकाळच्या सत्रातील सुरूवातीच्या कलातच चांदी तब्बल ६ ते ७% कोसळली. उपलब्ध माहितीनुसार, चांदीच्या निर्देशांकात सकाळी ६% घसरण झाल्याने दरु२३५९५२ रूपयांवर पोहोचली होती. आज दिवसभरात चांदी ७२ डॉलर प्रति औंसवर पोहोचल्याने मोठ्या प्रमाणात चांदी घसरल्याचे पहायला मिळाले आहे.

इयर टू डेट बेसिसवर चांदीने आतापर्यंत १५७% परतावा दिला आहे. २८ डिसेंबरला चांदी तब्बल ८३.९२ डॉलर प्रति औंसवर पोहोचली होती. संध्याकाळपर्यंत जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात ७.९६% घसरण झाल्याने दरपातळी ७१.७० डॉलर प्रति औंसवर गेली आहे. युक्रेन रशिया यांच्यातील संबंध अनिश्चित असताना काही सकारात्मक घडामोडींमुळे घसरलेली चांदी आज वाढलेल्या यिल्ड व व्याजदरात कपात होण्याची शक्यता यामुळे पुन्हा घसरली. आज दिवसभरात चांदीच्या स्पॉट गुंतवणूकीसह ईपीएफ गुंतवणूकीत स्थिरता मिळाल्याने चांदीच्या किंमती नियंत्रित राहिल्या आहेत.

अल्पावधीतील अस्थिरतेनंतरही चांदी सुमारे १८०% च्या अपवादात्मक वार्षिक रॅलीच्या मार्गावर आहे. १९७९ नंतरची ही चांदीची सर्वोच्च कामगिरी नोंदवली गेली आहे. वाढत्या मजबूत औद्योगिक मागणी, जागतिक पुरवठ्यातील सततची कमतरता, ईटीएफमधील सततचा निधी प्रवाह, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि अमेरिकेने केलेल्या तीन व्याजदर कपातीची पार्श्वभूमी यामुळे किमतींना आधार मिळत आहे आणि बाजारपेठा आर्थिक वर्ष २०२६ मध्ये पुढील आर्थिक शिथिलतेची शक्यता गृहीत धरत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >