मुंबई : महाराष्ट्रातल्या २९ महापालिकांमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी आहे. या सर्व महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आता अर्ज छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २ जानेवारीपर्यंतची मुदत आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुका लढवण्यासाठी युती - आघाडी समीकरण निश्चित केले आहे. राज्यात १४ मनपांमध्ये भाजपने युती केलेली नाही. उर्वरित ठिकाणी भाजपने युती केली आहे.
२९ महापालिकांतील लढतींचे चित्र स्पष्ट; मनसेच्या धास्तीने काँग्रेसने उबाठाशी अधिकची सलगी टाळली मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या ...
- मुंबई : (भाजप-शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे-शरद पवार गट) विरुद्ध (राष्ट्रवादी) विरुद्ध (काँग्रेस-वंचित) विरुद्ध (समाजवादी पार्टी) विरुद्ध (रिपाइं) विरुद्ध (आप) विरुद्ध (एमआयएम)
- ठाणे : (भाजप-शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे-शरद पवार गट) विरुद्ध (राष्ट्रवादी) विरुद्ध (काँग्रेस)
- नवी मुंबई : (भाजप) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे-शरद पवार गट) विरुद्ध (राष्ट्रवादी) विरुद्ध (काँग्रेस)
- कल्याण-डोंबिवली : (भाजप-शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे) विरुद्ध (राष्ट्रवादी) विरुद्ध (काँग्रेस-शरद पवार-वंचित)
- पनवेल : (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाइं) विरुद्ध (शेकाप-उबाठा-काँग्रेस-मनसे-शरद पवार गट-समाजवादी पार्टी-वंचित)
- मीरा-भाईंदर : (भाजप) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे-शरद पवार गट)
- वसई-विरार : (भाजप) विरुद्ध (बविआ-काँग्रेस-मनसे) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (उबाठा)
- उल्हासनगर : (भाजप) विरुद्ध (शिवसेना-टीम ओमी कलानी- साई पार्टी) विरुद्ध (उबाठा-मनसे-शरद पवार गट)
- भिवंडी-निजामपूर : (भाजप-शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे) विरुद्ध (राष्ट्रवादी) विरुद्ध समाजवादी पार्टी
- मालेगाव : (भाजप) विरुद्ध (शिवसेना-राष्ट्रवादी) विरुद्ध (उबाठा-मनसे-शरद पवार गट)
- नाशिक : (भाजप) विरुद्ध (शिवसेना-राष्ट्रवादी) (उबाठा-मनसे-काँग्रेस-शरद पवार)
- पुणे : (भाजप) विरुद्ध (दोन्ही राष्ट्रवादी) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे-काँग्रेस)
- पिंपरी-चिंचवड : (भाजप) विरुद्ध (दोन्ही राष्ट्रवादी) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे-काँग्रेस)
- छत्रपती संभाजीनगर : (भाजप) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (उबाठा-मनसे) विरुद्ध (राष्ट्रवादी)
- नागपूर : (भाजप-शिवसेना) विरुद्ध (काँग्रेस, उबाठा-शरद पवार गट)
- अहिल्यानगर : (भाजप) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध (काँग्रेस-शरद पवार-उबाठा) विरुद्ध (मनसे)





