मोहित सोमण: जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे जसे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले तसा मात्र चांगल्या फंडांमेटल वाढीमुळे बाजाराला फायदाही मिळाला आहे. शेअर बाजारात मायक्रो व मॅक्रो इकॉनॉमिक घटकांचा फायदाही बाजारात झाला. कालच्या आरबीआयच्या अहवालातील हे प्रामुख्याने स्पष्ट झाले असताना दुसरीकडे आजही जागतिक अस्थिरतेचे आव्हान कायम आहे. दरम्यान टेक्निकल व फंडामेंटल दृष्टीने नव्या वर्षाची सुरूवात चांगल्या परताव्यातून अपेक्षित असताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने (Motilal Oswal Financial Services) या ब्रोकरेज कंपनीने काही शेअर आर्थिक वर्ष २०२६ मधील कालावधीत गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. खरं तर निफ्टीने या वर्षी १०% वाढ इयर टू डेट (YTD) पातळीवर वाढला आहे. यावर्षी मिडकॅपमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली तरी ब्रोकरेज मते स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता कायम राहून घसरण अधिक झाल्याने पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना आकर्षित परतावा मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर मोतीलाल ओसवालने मजबूत देशांतर्गत गुंतवणुकीच्या ओघामुळे आणि स्थिर आर्थिक वाढीमुळे, निफ्टी डिसेंबर २०२५ मध्ये २६३२५ पातळीच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून, निफ्टीचा १ वर्षाचा फॉरवर्ड पी/ई गुणोत्तर २१.५ पट आहे जो त्याच्या २०.८ पट असलेल्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा (LPA) सुमारे ४% जास्त आहे. त्या तुलनेत, व्यापक बाजाराचे मूल्यांकन उच्च पातळीवर राहिले आहे. निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉलकॅप १०० हे अनुक्रमे २९ पट आणि २५ पट पी/ई (Price to Equity Ratio) गुणोत्तरावर व्यवहार करत आहे असे ब्रोकरेजने म्हटले.
ब्रोकरेच मते, जे त्यांच्या संबंधित दीर्घकालीन सरासरीपेक्षा सुमारे २६% आणि ५०% प्रीमियम पातळीवर दर्शवतात. यावरून असे सूचित होते की, अलीकडील झालेल्या घसरणीनंतर लार्जकॅप कंपन्यांचे मूल्यांकन तुलनेने वर्षभरात वाजवी पातळीवर आहे. ब्रोकरेजने म्हटले आहे की मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्ससाठी अधिक निवडक दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता गुंतवणूकदारांना अधिक आहे.
आणखी ब्रोकरेजने काय म्हटले?
अनुकूल लोकसंख्याशास्त्र, वाढता डिजिटल अवलंब, घरगुती बचतीचे वाढते वित्तीयकरण आणि सुधारणांचा सातत्यपूर्ण वेग यामुळे भारताची दीर्घकालीन संरचनात्मक वाढीची गाथा अबाधित आहे. आम्हाला विश्वास आहे की, सरकारचे सध्याचे धोरणात्मक उपक्रम मध्यम मुदतीत कॉर्पोरेट कमाईची दिशा बदलण्यास मदत करतील. आम्हाला अपेक्षा आहे की निफ्टीच्या कमाईची वाढ आर्थिक वर्ष २६ मध्ये ९% पर्यंत वाढेल (आर्थिक वर्ष २५ मधील १% वरून) आणि आर्थिक वर्ष २७ आणि २८ मध्ये ती आणखी सुधारून सुमारे १५% होईल.
मोतीलाल ओसवाल मते, २०२६ वर्षासाठी आकर्षक परतावा देणारे कुठले शेअर खरेदी करावा?
१)Bharati Airtel- भारती एअरटेल कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सामान्य खरेदी किंमत (Common Market Price CMP) २१०६ रूपये प्रति शेअर दिली आहे. ब्रोकरेजच्या मते या शेअर्समध्ये १२% अपसाईड संभाव्य वाढीची शक्यता आहे. कंपनीने २३६५ रूपये प्रति शेअरवर लक्ष्य किंमत (Target Price TP) निश्चित केली आहे.
२) SBI- ब्रोकरेजने एसबीआय (State Bank of India) बँकेच्या शेअरला बाय कॉल दिला असून ९६६ रूपये सीएमपीसह लक्ष्य किंमत १४% अपसाईडसह ११०० रुपये निश्चित केली आहे.
३) HCL Technologies- कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी १६६१ रूपयांसह लक्ष्य किंमत २१५० रूपये ब्रोकरेजने निश्चित केली आहे.
४) Eternal- ब्रोकरेजने इटर्नल (Zomato) कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून सीएमपी ब्रोकरेजने २८२ रूपये प्रति शेअर निश्चित केली असून ४६% अपसाईड वाढीसह लक्ष्य किंमत ब्रोकरेजने ४१० रूपये निश्चित केली आहे.
५) TVS Motors- टीव्हीएस मोटर्स कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ३६३२ रूपये प्रति शेअर सीएमपीसह १४% वाढीची अपेक्षा ब्रोकरेजने व्यक्त केली आहे. ब्रोकरेजने लक्ष्य किंमत ४१५९ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.
६) Max Financial - मॅक्स फायनांशियल सर्विसेस कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला आहे. सीएमपी १६७० रूपयांवर असून २६% अपसाईड वाढीसह लक्ष्य किंमत ब्रोकरेजने २१०० रुपये निश्चित केली आहे.
७) Biocon- बायोकॉन कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून ब्रोकरेजने शेअरची सीएमपी ३९५ रूपये प्रति शेअर निश्चित केली आहे. तर ब्रोकरेजकडून शेअर्समध्ये १६% अपसाईड वाढीसह ५३२ रूपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
८) J K Cement- जे के सिमेंट कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी ५६८२ रुपये निश्चित करण्यात आली. तर २३% अपसाईड वाढीसह ब्रोकरेजने शेअरची लक्ष्य किंमत ७००० रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.
९) Poonawalla Fincorp - पुनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी ४७३ प्रति शेअर निश्चित केला आहे. यासह कंपनीच्या शेअर्समध्ये २३% अपसाईड वाढीसह ब्रोकरेजने ६०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत या शेअरसाठी निश्चित केली आहे.
१०) Privi Speciality- प्रिवी स्पेशालिटी कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी ३२६५ रूपये निश्चित केली आहे. तर ब्रोकरेजने शेअरसाठी लक्ष्य किंमत २१% अपसाईड वाढीसह ३९६० रूपये प्रति शेअर निश्चित केली.






