मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ९ जणांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवकांच्या एकूण २२७ जागा आहेत. या सर्व जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी आणि निकाल आहे. यासाठी सर्वच मोठे नेते कंबर कसत असून मुंबई महानगरपालिकेसाठी समाजवादी पक्ष सुद्धा मैदानात उतरला आहे.
मुंबई: मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला होता. सत्ताधारी आणि विरोधक ...
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे आज समाजवादी पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली असून उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे.






