सरकारकडून ३.७४ लाख कोटींच्या ट्रेझरी बील विक्रीची घोषणा

मुंबई: सरकारच्या तात्पुरत्या निधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार लघू काळासाठी ३.७४ लाख कोटींची निधी ट्रेझरी बील मार्फत उभारणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. चौथ्या तिमाहीत १२ आठवड्यापर्यंतच्या कालावधीसाठी हा निधी उभारला जाईल. वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २९००० ते ३५००० कोटी दरम्यान रक्कमेची ही सिक्युरिटीज बील बाजारात उपलब्ध केले जातील असे सांगितले जात आहे. सध्याची अर्थव्यवस्था पाहता देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील गरजा, तत्कालीन परिस्थिती, अस्थिरता याआधारे रक्कमेची आकडेवारी, रक्कमेची मुदत व बिलाचा कालावधी यावर निर्णय घेण्याची स्वतंत्रता सरकारकडे असणार आहे. अर्थात आरबीआयचा (Reserve Bank of India RBI) सल्ला व बँकेच्या मार्गदर्शनाअंतर्गत केंद्र सरकार यावर अंतिम निर्णय घेईल. गेल्या वर्षीही या कालावधीत सरकारने याच कारणासाठी २.४७ लाख कोटीची उभारणी केली होती.


याविषयी निश्चित माहिती देताना,'रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सल्ल्याने, सरकारला बाजारातील गरजा, बदलत्या बाजाराची परिस्थिती आणि इतर संबंधित घटकांनुसार, बाजाराला योग्य सूचना दिल्यानंतर ट्रेझरी बिलांच्या लिलावासाठीची सूचित रक्कम आणि वेळेत बदल करण्याचे स्वातंत्र्य असेल असे निवेदनात म्हटले आहे.' असे वित्त मंत्रालयाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.


ट्रेझरी बील हे सरकार आपल्या गरजेनुसार विविध तिमाहीत बाजारात दाखल करते. सरकारच्या विकासनिधीसाठी व अर्थव्यवस्थेतील गतीमानता नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार या निधीची उभारणी करते. गेल्या वर्षीही सरकारने या माध्यमातून निधी उभारणी केली होती. तात्पुरता निधी देय (Debt Fund) उभे करून सरकार विविध दैनंदिन व्यवहारातील निधीच्या गरजा पूर्ण करत असते. अर्थातच ही मोठी रक्कम सरकारने उभी केल्याने खेळत्या बाजारातील निधी मोठ्या प्रमाणात शोषला जातो. त्यामुळे भांडवली बाजारात क्रेडिट उभारणीसाठी आणखी मागणी वाढते. परिणामी बँकेला अतिरिक्त निधी उभारणीसाठी व्याजदरात वाढ करावी लागू शकते व कर्ज महागण्याची शक्यता असते. याखेरीज भांडवली बाजारातील तरलता कमी झाल्याने बाजारात क्रेडिटचा पुरवठा नियंत्रित केला जातो. मागील आठवड्यात सरकारने ओएमओ (Open Market Operation) बाँड खरेदी केले होते. वित्तीय पतधोरण समितीच्या बैठकीत २ लाख कोटीचे बाँड खरेदी करण्याचे आरबीआयच्या निर्णयानंतर आता या नव्या बीलाची खरेदी आरबीआय मार्फत करेल अशी माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

Election Updates : आता कुठे युती-आघाडी, तर कुठे बिघाडी

२९ महापालिकांतील लढतींचे चित्र स्पष्ट; मनसेच्या धास्तीने काँग्रेसने उबाठाशी अधिकची सलगी टाळली मुंबई :

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

राष्ट्रवादी काँग्रेसची ३० उमेदवारांची तिसरी व अंतिम यादी जाहीर ; राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार निवडणूक रिंगणात...

९४ उमेदवारांमध्ये ५२ लाडक्या बहिणी निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार ; लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी... मुंबई : मुंबई

'जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा'

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण

शिवडीत सिलेंडर स्फोट, गुरुकृपा चाळीत अग्नितांडव; ५ ते ६ घरे जळून खाक

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले असताना शिवडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर

Stock Market Closing: शेअर बाजारात अखेरच्या निफ्टी एक्सपायरीत अखेरच्या सत्रात रिकव्हरी मात्र किरकोळ घसरण कायम

मोहित सोमण:अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २०.४६ अंकाने घसरत ८४६७५.०८