Tuesday, December 30, 2025

इंडोनेशियात भीषण दुर्घटना

इंडोनेशियात भीषण दुर्घटना

जकार्ता : इंडोनेशियात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (२८ डिसेंबर) संध्याकाळी एका रिटायरमेंट होमला भीषण आग लागली असून यामध्ये १६ वृद्धांचा होरपळून मृत्यू झाला आहे. इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी प्रांतात मनाडो येथे ही घटना घडली आहे. मध्यरात्री रहिवासी झोपेत असताना आग लागली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून केवळ एकाच व्यक्तीचा मृतहेद जळण्यापासून वाचला आहे. तर या घटनेत जखमी झालेल्यांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. सध्या मृतांमध्ये कोणाचा समावेश होता याचा शोध घेतला जात आहे. यासाठी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

रिटायरमेंट होमच्या शेजारच्या रहिवाशांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तिथे तातडीने पोहोचल्या. मात्र आग विझवण्यासाठी जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही आग लागण्यामागचे कारण अस्पष्ट असून याची चौकशी केली जात आहे. संपूर्ण परिसरात बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आगीच्या ज्वाळा दिसल्या, यासोबतच लोकांच्या किंचाळ्यांचे आवाज ऐकू आले. शेजाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न देखील केले. पण आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलालाही विझवण्यात अडथळा येत होता.

Comments
Add Comment