मोहित सोमण:अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स २०.४६ अंकाने घसरत ८४६७५.०८ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ३.२५ अंकांने घसरत २५९३८.८५ पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळे आजही निफ्टी २६२०० व सेन्सेक्स ८५००० पातळी गाठण्यास अयशस्वी ठरला आहे. प्रामुख्याने शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्याची शक्यता असून तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर नफा बुकिंग झाल्याची शक्यता असल्याने व जागतिक अस्थिरतेमुळे शेअर बाजारात किरकोळ घसरण कायम राहिली असली तरी मेटल, पीएसयु बँक निर्देशांकात तुफान वाढ झाल्याने आयटी, रिअल्टी, कंज्यूमर ड्युरेबल्स निर्देशांकात मोठी घसरण झाली असून सुद्धा बाजार सावरण्यास मदत झाली. युएस व्हेनेझुएला यांच्यातील द्वंद्व सुरू असताना रशिया युक्रेन युद्ध व इराणला दिलेली डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली धमकी यामुळे जागतिक बाजार आज अस्थिर राहिला आहे. त्यामुळेच अंतिमतः शेअर बाजारात याचा प्रभाव पडला असताना बँक निर्देशांकाने मात्र आरबीआयच्या सकारात्मक अहवालानंतर मोठी वाढ नोंदवली आहे. याशिवाय मिड व स्मॉलकॅप शेअर्समध्ये आज किरकोळ घसरण कायम राहिली. आज मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात निफ्टी रिज (Nifty Rejig) व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढून घेतलेली गुंतवणूक यामुळे बाजारात नकारात्मक परिणाम दिसला. आज वर्षातील शेवटची निफ्टी एक्सपायरी असताना मात्र मेटल शेअर्समध्ये तुफान वाढ कायम असल्याने बाजारात रॅली झाली नसली तरी निर्देशांक किरकोळ घसरणीसह सपाट पातळीवर कायम राहिला आहे.
सकाळच्या सत्रातील घसरण शेवटच्या सत्रात सावरला असल्याने बाजारात काहीसा गुंतवणूकदारांना आधार मिळाल्याचे सूचित होत आहे. याशिवाय काल जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादनात गेल्या २ वर्षांतील सर्वाधिक वाढ झाल्याने बाजारातील तेजीचा अंडरकरंट कायम राहिला आहे. अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.५६%) सह स्ट्रेट टाईम्स (०.४७%), हेंगसेंग (०.७७%) बाजारात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण तैवान वेटेड (०.३५%) व, कोसपी (०.१५%), निकेयी २२५ (०.२१%) निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात वाढ डाऊ जोन्स (०.१३%) बाजारात झाली असून उर्वरित एस अँड पी ५०० (०.३५%), नासडाक (०.५०%) या दोन्ही बाजारात घसरण दिसली.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ हिंदुस्थान कॉपर (९.४२%), असाही इंडिया (७.६५%), होनसा कंज्यूमर (५.१८%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण लॉयड्स मेटल (६.७१%), कोरोमंडलम (५.३९%) समभागात झाली आहे.






