Tuesday, December 30, 2025

ओला इलेक्ट्रिक शेअर २% उसळला काय कारण आहे वाचा...

ओला इलेक्ट्रिक शेअर २% उसळला काय कारण आहे वाचा...

मोहित सोमण:  ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी (Ola Electric Mobility Limited) कंपनीचा शेअर आज ओला इलेक्ट्रिक २% पातळीवर उसळला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १.२१% वाढ झाल्याने प्रति शेअर व्यवहार ३५.४७ रुपयांवर सुरू होता. कंपनीने आज एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे सरकारचे ४६८० भारत सेलचे समर्थन असलेले रोडस्टर एक्स+ मोटरसायकल (Roadster X+ Motorcycle) नामक प्रमाणपत्र कंपनीला मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात कंपनीकडून पीएसआय (Production Linked Incentive PLI) योजनेसाठी आपली सरकार दरबारी निवड झाल्याचे कळवले गेले होते. याच पार्श्वभूमीवर आज कंपनीला आज भारत सेलचे नवे प्रमाणपत्र मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सेंट्रल मोटर्स व्हेईकल रूल्स (CMVR 1989) या नियमाला अनुसरून ४६८० भारत सेल बॅटरी पॅक तंत्रज्ञानाच्या अंतर्गत ओलाने आज नव्या रोडस्टर एक्स प्लस (Roadster X+ (9.1 kWh) मोटरसायकलची घोषणा केली. परिणामी गुंतवणूकदारांनी आज शेअरला चांगला प्रतिसाद दिला होता. परंतु गेल्या आठवड्यात पीएलआयच्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीनंतर अखेरच्या सत्रात घसरण पहावयास मिळाली होती. त्यामुळे संपूर्ण दिवसभरातील शेअरची कामगिरी पाहणे गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे ठरणार आहे.

या नव्या तंत्रज्ञानाचा उल्लेख करताना कंपनीने रोडस्टर एक्स+ ९.१kWh ने इलेक्ट्रिक मोटरसायकलिंगमध्ये एक नवीन बेंचमार्क स्थापन केला असल्याचा दावा केला आहे. जो ओलाच्या स्वदेशी ४६८० भारत सेल तंत्रज्ञानाच्या उच्च ऊर्जा घनतेसह प्रगत थर्मल कार्यक्षमतेमुळे ५०० किमी पर्यंतची रेंज ग्राहकांना प्रदान करतो. कंपनीच्या मते त्यामुळे ही मोटरसायकल शहरी केंद्रांच्या पलीकडेही लांब पल्ल्याची इंटरसिटी राइडिंग व्यावहारिक बनवते. लांबचे अंतर असलेल्या आणि मर्यादित चार्जिंग पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणी ही मोटर सायकल व्यवहारिक ठरेल असा दावा कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात केला आहे.यापूर्वी ईव्ही चार्जिंग व पायाभूत सुविधेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित केला गेला होता. एकीकडे ईव्ही तंत्रज्ञान विकसित होत असताना पुरेश्या पायाभूत सुविधेची वानवा असल्याने ग्राहक ईव्हीकडे अपेक्षेप्रमाणे तूर्तास वळत नसल्याचे पहायला मिळत नसताना ओलाने त्यावर सोलूशन म्हणून ही गाडी बाजारात दाखल केली आहे.

याविषयी अधिकृत विवेचनात ओला इलेक्ट्रिकच्या प्रवक्त्याने सांगितले, 'रोडस्टर एक्स+ चे सरकारी प्रमाणीकरण हा भारतात एंड-टू-एंड ईव्ही तंत्रज्ञान विकसित करण्याच्या ओला इलेक्ट्रिकच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. रोडस्टर एक्स+ (९.१kWh) सह, आम्ही आमच्या स्वतःच्या सेल आणि बॅटरी तंत्रज्ञानाद्वारे समर्थित, अतुलनीय रेंजसह उत्कृष्ट कार्यक्षमता, सुरक्षा आणि विश्वासार्हता प्रदान करत आहोत. हे भारताच्या मोटरसायकल-प्रबळ २-चाकी बाजारपेठेत ईव्हीचा स्वीकार वाढवण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे.' असे म्हटले.

रोडस्टर एक्स+ (९.१ kWh) च्या प्रमाणीकरणामुळे, ओला इलेक्ट्रिकने आता आपल्या इन-हाउस विकसित ४६८० भारत सेल तंत्रज्ञानाचा वापर आपल्या दुचाकी पोर्टफोलिओमध्ये, इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटरसायकल या दोन्हींमध्ये वाढवला आहे. हेच ४६८० भारत सेल प्लॅटफॉर्म ओला शक्तीला (Ola Shakti) देखील आधार देईल, ज्यामुळे कंपनीचा सेल, बॅटरी पॅक आणि वाहन प्लॅटफॉर्ममधील उभ्या एकात्मिक दृष्टिकोनाला बळकटी मिळेल असेही ओलाने म्हटले.

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादकांपैकी एक आहे. कंपनी ईव्ही आणि त्यांच्या घटकांसाठी उत्पादन करते ज्यात बॅटरी सेलचा समावेश आहे. तामिळनाडू येथील कंपनीची ओला फ्युचरफॅक्टरी असून तिथे ईव्ही आणि महत्त्वाचे घटक तयार केले जातात. ओलाचे बंगळूरस्थित बॅटरी इनोव्हेशन सेंटर (BIC) देखील आहे जिथे मोठ्या प्रमाणात कंपनीकडून रिसर्च अँड डेव्हलपमेंट ईव्ही बाजारासाठी केले जाते. सकाळच्या सत्रात शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने शेअर इंट्राडे उच्चांकावर पोहोचण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या १ आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ३.४५% वाढ झाली असली तरी एक महिन्याच्या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये १२.७६% घसरण झाली असून इयर टू डेट (YTD) आधारावर कंपनीच्या शेअर्समध्ये ५८.३०% घसरण झाली आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १५८५२.५२ कोटी रुपये आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >