सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे
मधुमेही देखील खाऊ शकतील अशी ओट्स–दुधाची खीर. साधी आहे, पचायला हलकी आहे आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी खास आहे.
साहित्य :
ओट्स – २ टेबलस्पून
कमी फॅट दूध-१ कप
बदाम –४-५ (कापलेले)
अक्रोड – १ (ऐच्छिक)
वेलची पावडर – चिमूटभर
गूळ पावडर / स्टीव्हिया – अगदी थोडं (ऐच्छिक)
कृती :
ओट्स कोरड्या कढईत हलकेसे भाजून घ्या.
दुसऱ्या भांड्यात दूध उकळत ठेवा.
दुधात भाजलेले ओट्स घालून मंद आचेवर शिजू द्या.
खीर जाडसर झाली की बदाम, अक्रोड व वेलची घाला.
गोड हवं असल्यास गूळ पावडर किंवा स्टीव्हिया अगदी थोडं घाला.
गरम किंवा कोमट सर्व्ह करा.
आरोग्यदायी गुण
साखर नाही, फायबरयुक्त, पोट हलकं ठेवणारी खीर.






