Tuesday, December 30, 2025

Nifty Rejig: निफ्टी निर्देशांकात फेरबदलाची तारीख नव्या स्क्रिपचा समावेश झाल्याने बाजारात मोठ्या उलाढाली सुरु 'ही' आहे माहिती

Nifty Rejig: निफ्टी निर्देशांकात फेरबदलाची तारीख नव्या स्क्रिपचा समावेश झाल्याने बाजारात मोठ्या उलाढाली सुरु 'ही' आहे माहिती

मोहित सोमण:आज डिसेंबर निफ्टी समायोजनाचा (Nifty Adjustment) अथवा निफ्टी रिज (Nifty Rejig) दिवस असल्याने आज निफ्टी निर्देशांकात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. त्यामुळे या निर्देशांकात मोठ्या प्रमाणात बदल अपेक्षित असून गुंतवणूकदारांच्या दृष्टीने शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात फेरबदल होणार आहेत. निफ्टी ५० बेंचमार्क निर्देशांकात मोठ्या परिणामकारक कंपन्याचे समावेशन करण्यात येते व काही कंपन्याचा नव्याने समावेश होतो. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत सुद्धा बदल करण्यात येतो ज्याचा थेट परिणाम शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या कमाईत होतो. अशातच सप्टेंबर महिन्यात इंटरग्लोब एव्हिऐशन (IndiGo), मॅक्स हेल्थकेअर या कंपन्यांचा समावेश झाला होता तर हिरो मोटोकॉर्प, इंडसइंड कंपन्यांना निफ्टी ५० मधून वगळण्यात आले होते. हीच पार्श्वभूमी कायम असताना कायम असताना येस बँक, व युनियन बँकेने निर्देशांकात प्रवेश मिळवला असल्याने या बँकांच्या गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात घरगुती व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून आवक (Inflow) येत असून आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँकांच्या गुंतवणूकीत मात्र घसरण होत असून या बँकेच्या गुंतवणूकीत जावक (Outflow) होत आहे. सर्वाधिक आवक झालेले शेअर आयशर मोटर्स, मारूती सुझुकी, एशियन पेंटस, हिंदाल्को, एसबीआय ठरले असून सर्वाधिक जावक झालेले शेअर हे आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बीईएल, बजाज फिनसर्व्ह, मॅक्स हेल्थकेअर ठरले आहेत.

बुधवारपासून, जानेवारी मालिकेच्या (January Rejig Series) मध्ये सुरुवातीला, येस बँक आणि युनियन बँक यांचा निफ्टी बँक निर्देशांकात समावेश केला जाणार असून या नवीन समावेशांमुळे अनुक्रमे ३५ दशलक्ष डॉलर्स आणि ३२ दशलक्ष डॉलर्सचा निधी बाजारात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, फेडरल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, पीएनबी, इंडसइंड बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँक यांसारख्या निफ्टी बँकेच्या सध्याच्या घटकांचे वेटेज वाढेल, ज्यामुळे प्रत्येकी ११ दशलक्ष ते १६ दशलक्ष डॉलर्सचा अतिरिक्त निधी येईल असे तज्ज्ञ सांगत आहेत.

तज्ञांच्या मते, आवक झालेल्या या पाच निर्देशांकावरील त्यांचे वेटेज वाढत असल्याने या शेअर्समध्ये ७४ दशलक्ष ते ८२ दशलक्ष डॉलर्सचा निधी गुंतवणूक म्हणून येण्याची शक्यता आहे जे सध्याच्या पुनर्संतुलन प्रक्रियेचे व्यापक स्वरूप दर्शवते असे म्हटले असून जावक होत असलेल्या स्क्रिप बास्केटमध्ये सुधारित नियमांनुसार मुख्य निफ्टी आणि निफ्टी बँक या दोन्ही निर्देशांकांवर आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेचे वेटेज समायोजित केले जात असल्याने या बँकांमधून अनुक्रमे १५२ दशलक्ष डॉलर्स आणि १४९ दशलक्ष डॉलर्सचा सर्वाधिक निधी बाहेर जात आहे.

बाजार तज्ज्ञ असलेल्या नुवामा रिसर्च मते, या पुनरावलोकनामध्ये (Rejig) फ्री-फ्लोट वेटेज बदलांमुळे व्यापक पॅसिव्ह निर्देशांकांमध्ये प्रवाहाचे समायोजन अपेक्षित आहे.'अनेक स्ट्रॅटेजी निर्देशांकांमध्ये काही शेअर्सचा समावेश आणि वगळणी केली जाईल. महत्त्वाचे म्हणजे, निफ्टी बँक निर्देशांकाच्या पद्धतीमध्ये बदल होतील, ज्यामुळे सदस्य कंपन्यांच्या वजनातील समायोजनासोबतच दोन नवीन कंपन्यांचा समावेश होईल'असे नुवामाचे पर्यायी आणि परिमाणात्मक संशोधन विभागाचे प्रमुख अभिलाष पागारिया यांनी सांगितले आहे.

यावेळी नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चने सांगितले की, व्यापक निर्देशांकांमधील तिमाही पुनर्रचनेतून मिळणारा एकत्रित प्रवाह, तसेच निवडक स्ट्रॅटेजिक निर्देशांकांच्या सहामाही पुनर्रचनेतून ज्यामध्ये निफ्टी २०० मोमेंटम ३० निर्देशांकाचा सर्वाधिक ट्रॅकिंग आहे असे सूचित होते आहे की, निवडक ऑटो कंपन्यांमध्ये मजबूत गुंतवणुकीचा ओघ येऊ शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >