Thursday, March 26, 2026

गुजरात किडनी आयपीओचे गुंतवणूकदार १ दिवसात मालामाल! शेअर ६% प्रिमियमसह बाजारात सूचीबद्ध

गुजरात किडनी आयपीओचे गुंतवणूकदार १ दिवसात मालामाल! शेअर ६% प्रिमियमसह बाजारात सूचीबद्ध

मोहित सोमण: गुजरात किडनी अँड सुपर स्पेशालिटी लिमिटेड कंपनीचे शेअर बाजारात दमदार पदार्पण झाले आहे. सकाळी सत्राच्या सुरुवातीला कंपनचा शेअर ६% उसळला आहे. मूळ प्राईज बँड असलेल्या ११४ रुपये प्रति शेअर तुलनेत कंपनीचा शेअर १२० रूपये प्रति शेअर (५.२६%) दरासह बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला आहे. कंपनीचा शेअर बाजारात दाखल होण्यापूर्वी प्राथमिक बाजारात आयपीओ २२ ते २४ डिसेंबर दरम्यान दाखल झाला होता. त्यामुळे आज प्रिमियम दरात शेअर बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध झाला आहे. २५०. ८० कोटींच्या आयपीओसाठी २.२० कोटी इक्विटी शेअर फ्रेश इशू म्हणून गुंतवणूकदारांसाठी दाखल झाले होते. कंपनीची शेवटची जीएमपी (Grey Market Price GMP) ११५.५ रुपये प्रति शेअर होती त्याहून ५ रुपये प्रिमियने शेअर आज सूचीबद्ध झाला आहे.

आयपीओआधी कंपनीने १००.०१ कोटी रुपये अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केले असून कंपनीच्या आयपीओला एकूण ५.२१ कोटींचे सबस्क्रिप्शन मिळाले होते. एकूण आयपीओपैकी रिटेल गुंतवणूकदारांकडून १९.०४ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १.०६ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ५.७३ पटीने सबस्क्रिप्शन आयपीओला मिळाले होते. आयपीओआधी कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ८९८.८१ कोटी होते ते आयपीओनंतर ९५२.०३ कोटी रुपये झाले आहे.

गेल्या आर्थिक वर्षात इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीला ६३७% अधिक महसूल मिळाला असून इयर ऑन इयर बेसिसवर करोत्तर नफ्यात ४५४% वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर अधिग्रहण, इतर सामग्रीच्या खरेदीसाठी, थकबाकी चुकती करण्यासाठी, अँडव्हान्स देयी भरण्यासाठी, कंपनीच्या वाढीसाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे. डॉ प्रग्नेश यशवंतसिंह भरपोडा, डॉ भारतीबेन प्रग्नेश भरपोडा, डॉ यशवंतसिंह मोतीसिंह भरपोडा आणि अनिताबेन यशवंतसिंह भरपोडा हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >