मुंबई: मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला होता. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांच्या गोटामध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत. तर मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र लढणार नसून केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे मुंबईत एकत्र निवडणूक लढवत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवताना दिसत आहे. विशेष म्हणजे महायुतीतील मित्रपक्ष वेगवेगळे लढत असले तरी अजित पवार यांनी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात पहिला नंबर लावला असून शेवटच्या दिवशी अजित पवारांनी ५२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.






