Tuesday, December 30, 2025

एनएसईकडून गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्वाची सूचना- भामट्यांची माहिती वाचा नावासकट!

एनएसईकडून गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्वाची सूचना- भामट्यांची माहिती वाचा नावासकट!

मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) ने गुंतवणूकदारांना काही अपंजीकृत व्यक्ती (Unregistered) आणि संस्थांविरुद्ध (Organisation) यांच्याविरोधात सावधगिरीचा इशारा दिला आहे. एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती कथितरित्या अनधिकृतपणे सिक्युरिटीज मार्केट टिप्स गुंतवणूकदारांना देत आहेत आणि गुंतवणूकदारांना खात्रीशीर/हमीयुक्त परताव्याचे खोटे दावे करत आहेत. यापूर्वी काही गुंतवणूकदार या विळख्यात सापडल्याने एनएसईने युद्धपातळीवर नवीन सूचना प्रसिद्ध करत नुकतीच संबंधित माहिती दिली आहे.

एक्सचेंजला कळवण्यात आले आहे की,' प्रमोद रावजी आणि प्रमोद यादव नावाच्या व्यक्ती फोन नंबर ९६५३८८२८८८ या मोबाईल क्रमांकाद्वारे,डेली शुअर प्रॉफिट (https://www.youtube.com/@DailySureProfit) आणि द नेक्स्ट जेन ट्रेडिंग नावाचे युट्यूब चॅनेल चालवले जात असून  (https://www.youtube.com/@TheNextGenTrading) नावाच्या यूट्यूब चॅनेलद्वारे आणि https://t.me/+49JIiijh4kNhMDRl आणि t.me/SmartTradeSoftware या लिंक्सद्वारे उपलब्ध असलेल्या टेलिग्राम चॅनेलद्वारे संबंधित व्यक्ती व्यासपीठांचा गैरवापर करत असल्याचा वैधानिक इशारा एक्सचेंजने आज मंगळवारी दिला आहे. संबंधित व्यक्ती सिक्युरिटीज मार्केट टिप्स देण्याच्या आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीवर खात्रीशीर हमीयुक्त परतावा देण्याच्या कामात गुंतलेली असल्याचं दावा एक्सचेंजने केला आहे.

आणखी एका व्यक्तीच्या बाबत एनएसईपुढे, एक्सचेंजच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, अभिषेक नावाचा एक व्यक्ती, जो ८५४५८५८६३२ या मोबाईल क्रमांकाद्वारे कार्यरत आहे तो गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केट टिप्स देत आहे तसेच गुंतवणूकदारांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड घेऊन त्यांचे ट्रेडिंग खाते हाताळण्याची ऑफर देत आहे, तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीवर खात्रीशीर परताव्याची हमी देत आहे त्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांचा गैरवापर सुरु होत असल्याचे दिसून येत आहे.

याव्यतिरिक्त, एक्सचेंजला कळवण्यात आले आहे की, आयुषी नावाची एक व्यक्ती जी ७९८७६३९२८७ आणि ९१६५११४१७५ या मोबाईल क्रमांकांद्वारे आणि https://trademind.world/themes/premium/ या वेबसाइटद्वारे कार्यरत आहे, ती कथितरित्या सिक्युरिटीज मार्केट टिप्स देत आहे, खात्रीशीर/हमीयुक्त परताव्याचे दावे करत आहे लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळवून गुंतवणूकदारांची ट्रेडिंग खाती चालवण्याची ऑफर देत आहे आणि डब्बा/बेकायदेशीर ट्रेडिंग सेवा सुलभ करत आहे असे एनएसईने म्हटले आहे.

एनएसईकडून सावधतेचा इशारा-

गुंतवणूकदारांना सावध करण्यात येत आहे आणि सल्ला दिला जातो की, शेअर बाजारात सूचक/खात्रीशीर/हमीयुक्त परतावा देणाऱ्या कोणत्याही व्यक्ती/संस्थेद्वारे देऊ केलेल्या कोणत्याही योजना/उत्पादनाची सदस्यता घेऊ नये कारण ते कायद्याने निषिद्ध आहे. तसेच, गुंतवणूकदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी त्यांचे ट्रेडिंग क्रेडेन्शियल्स जसे की यूजर आयडी/पासवर्ड कोणाशीही शेअर करू नयेत. हे देखील लक्षात घ्यावे की, नमूद केलेल्या व्यक्ती/संस्था नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या कोणत्याही नोंदणीकृत सदस्याचे सदस्य किंवा अधिकृत व्यक्ती म्हणून नोंदणीकृत नाहीत.

तसेच एक्सचेंजने आपल्या वेबसाइटवर https://www.nseindia.com/invest/find-a-stock-broker या लिंक अंतर्गत नोंदणीकृत सदस्य आणि त्यांच्या अधिकृत व्यक्तींचे तपशील तपासण्यासाठी "तुमच्या स्टॉक ब्रोकरला जाणून घ्या/शोधा" ही सुविधा प्रदान केली आहे. पुढे, ट्रेडिंग सदस्यांनी एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांकडून पैसे घेण्यासाठी/देण्यासाठी वापरली जाणारी आणि क्लायंट बँक खाती म्हणून ओळखली जाणारी  बँक खाती देखील उपरोक्त लिंकवर प्रदर्शित केली आहेत. गुंतवणूकदारांना कोणत्याही व्यक्ती/संस्थेशी व्यवहार करताना तपशील तपासण्याचा सल्ला दिला जातो.

एक्सचेंजने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकांची एकत्रित यादी NSE वेबसाइटवर

https://www.nseindia.com/invest/advisory-for-investors या लिंक अंतर्गत उपलब्ध आहे. (अशा प्रतिबंधित योजनांमध्ये सहभाग घेणे हे गुंतवणूकदारांच्या स्वतःच्या जोखमीवर, खर्चावर आणि परिणामांवर अवलंबून असेल, कारण अशा योजनांना एक्सचेंजने मान्यता दिलेली नाही किंवा त्यांचे समर्थन केलेले नाही)

गुंतवणूकदारांनी नोंद घ्यावी की, अशा कोणत्याही प्रतिबंधित योजनांशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या विवादांसाठी, गुंतवणूकदारांना खालीलपैकी कोणताही उपाय उपलब्ध होणार नाही:

१. एक्सचेंजच्या अधिकारक्षेत्रांतर्गत गुंतवणूकदार संरक्षणाचे फायदे

२. एक्सचेंज विवाद निवारण यंत्रणा

३. एक्सचेंजद्वारे प्रशासित गुंतवणूकदार तक्रार निवारण यंत्रणा

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा